rajapur rajan salvi_kiran samant : सत्तेची चावी, कुणब्यांच्या हाती
राजापुरात तिरंगी लढत
काँग्रेसच्या अविनाश लाडांची एन्ट्री
किरण सामंतांना फायदा की राजन साळवींना फटका ?
विशेष प्रतिनिधी
राजापूर - गेली अनेक दशके शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा राजापूर - लांजा - साखरपा विधानसभा मतदारसंघ हा ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र शिवसेना फुटली आणि शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना अशी दोन गटात विभागणी झाली. त्यातच या मतदारसंघातील विकासकामांमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. आता जरी शिवसेना फुटली तरी गेल्या काही वर्षांत याच शिवसेनेची सत्ता असतानाही म्हणावा तसा विकास झाला नाही, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यातच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी अपक्ष म्हणून विधानसभा निवडणुकीत उडी घेतल्याने राजापूर - लांजा - साखरपा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. असे असले तरी या मतदारसंघात कुणबी कार्ड महत्त्वाचे ठरणार आहे.
निवडणुकीआधी फटाके फोडा, येथे भेट द्या
राजापूर - लांजा - साखरपा मतदारसंघात कुणबी व्होट बँक मोठी आहे. त्यामुळे काही वर्षांपासून या मतदारसंघात कुणबी नेतृत्वाला वाव मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कारण या पट्ट्यातील सर्व कुणबी एकगठ्ठा मते मिळण्याची संधी होती. मात्र आता तिरंगी लढत असल्यामुळे कुणबी मतांचे विभाजन होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कुणबी मते आपल्याकडे कशी वळवण्यात येतील, यासाठी राजकीय रणनीतीला सुरुवात झाली आहे.
राजापूर मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे किरण सामंत, ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन साळवी उमदेवार म्हणून उभे आहेत. किरण सामंत आणि राजन साळवी अर्थात शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना रंगण्याची चिन्ह होती. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली. राजापूर मतदारसंघात अद्याप ठाकरेंच्या शिवसेनेला पसंती असल्याची चर्चा असल्याने आणि भावनिक मु्द्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान होण्याची शक्यता गृहीत धरून ही रणनीती आखल्याची चर्चा आहे. मात्र शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत यांनीही विकासकामे आणि संपर्कावर भर दिल्याने त्यांचेही पारडे जड असल्याची चर्चा आहे.
राजापूर मतदारसंघात अनेक भागात अविनाश लाड यांना पाठिंबा असल्याचीही चर्चा आहे. विशेषत: लांजा परिसात अविनाश लाड यांचे पारडे जड आहे. त्यामुळे काही कुणबी मते अविनाश लाड यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत आमदार राजन साळवी यांच्याविरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचा निसटता पराभव झाला होता. अविनाश लाड यांना ५३ हजार ५५७ तर राजन साळवी यांना ६५ हजार ४३३ इतकी मते मिळाली होती. राजन साळवी यांनी विजय मिळवला असला तरी या विधानसभा निवडणुकीत अविनाश लाड यांचे राजन साळवींसमोर आव्हान असणार आहे.
तिन्ही नेत्यांना होणाऱ्या मतदानात कुणबी मते निर्णायक ठरणार आहेत. रिफायनरी प्रकल्प आणि अणुऊर्जा प्रकल्प या प्रकल्पांच्या संदर्भात राजन साळवी यांच्या भूमिकेवर अविनाश लाड यांनी आक्षेप घेतला आहे तर रिफानरीविरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे किरण सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. एकूणच राजापुरातील राजकीय समीकरणे पाहता जनता राजापूरची सत्ता उदय सामंत, राजन साळवी आणि अविनाश लाड यांच्या हाती सोपवणार हे २३ तारखेच्या निकालात स्पष्ट होईल.
0 Comments