Header Ads Widget

rajan salvi_sandeep radaye : इंजिन सुटले, शिवबंधनात अडकले


rajan salvi_sandeep radaye :  इंजिन सुटले, शिवबंधनात अडकले

संदीप शेमणकर

राजापूर - मनसेचे राजापूर तालुका माजी सहसंपर्कप्रमुख आणि कुणबी युवा राजापूरचे माजी युवा अध्यक्ष  आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप राडये यांनी मनसेची साथ सोडत ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवबंधन बांधले. राजापूर, लांजा, साखरपा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांच्या उपस्थित ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

कर्जासाठी धडपड करत आहात तर येथे भेट द्या

आमदार राजन साळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत संदीप राडये यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणे पसंत केले. धाऊलवल्ली शिवसेना शाखा उद्धाटनप्रसंगी संदीप राडये यांनी मनसेला रामराम करत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.तसेच कोंडसर बुद्रुक गावातील साधना घाणेकर,दीपक मोगरकर यांनी जाहीर प्रवेश केला.

गेम खेळा, पैसा कमवा

यावेळी आमदार राजन साळवी,माजी आमदार गणपतराव कदम, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी,राजापूर तालुका संपर्कप्रमुख अनिल भोवड,देवाचे गोठणे विभाग संपर्कप्रमुख तुळशीदास नवाळे,सहसंपर्कप्रमुख मधुकर मांडवकर, तालुकाप्रमुख कमलाकर कदम,माजी सभापती प्रकाश गुरव,विभाग संघटक प्रकाश डुकले,विभागप्रमुख नरेश शेलार,उपविभागप्रमुख अमोल पाडेकर,उपविभागप्रमुख सुभाष पावणाक,महिला उपविभाग प्रमुख समीक्षा कुवेस्कर, माजी पंचायत समिती सदस्य नलिनी शेलार,धाऊलवल्लीच्या सरपंच रश्मी बाणे,गाव संघटक हरिश्चंद्र शेडेकर,एकनाथ तोस्कर, प्रकाश चव्हाण, हरिश्चंद्र दळवी,शाखाप्रमुख सत्यवान नार्वेकर, मनोहर गुरुव,गणपत आयार, भरत चौगुले,मोगरे शाखाप्रमुख रविकांत जोशी,उपशाखाप्रमुख राजेंद्र सातोपे,शिवसैनिक आणि महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments