Header Ads Widget

मराठी भाषेला अभिजात दर्जा, एखादी भाषा अभिजात कशी ठरते?


मराठी भाषेला अभिजात दर्जा, एखादी भाषा अभिजात कशी ठरते?

केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मराठीबरोबरच पाली, प्राकृत, असामी, आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट केलं आहे. ते म्हणतात, “मराठी भाषा हा देशाचा अभिमान आहे. या उत्तुंग भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. देशाच्या इतिहासात मराठी भाषेचा समृद्ध सांस्कृतिक वारशाचं योगदान या सन्मानामुळे अधोरेखित झालं आहे. भारताच्या परंपरेत मराठी कायमच अत्यंत महत्त्वाची आहे. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे अनेक लोकांना मराठी भाषा शिकण्याची प्रेरणा मिळेल असा मला विश्वास वाटतो."

पैसे मिळत नाहीत, मग टेन्शन नको, इथे भेट द्या

अभिजात भाषा या भारताच्या पुरातन वारशाचं जतन करण्याचं काम करतात. तसंच प्रत्येक समुदायाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित होते, यामुळे हा दर्जा मराठी भाषेला मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते.

“माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ॥ समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!!” अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिलेल्या पोस्टमध्ये ते पुढे म्हणतात, “अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जी तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे सहाय्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार!”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही अनेक वर्षं मागणी केली होती. ती मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली. याबद्दल त्यांचे आभार. हा सोन्याचा दिवस आहे. मा. पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप आभार. मी मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केले, पुरावे दिले, महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने आणि जगभरातील मराठी लोकांच्या वतीने मी मोदीजींचे आभार मानतो.”

"लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला.

"नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे," असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

भारत सरकारने भाषांना अभिजात भाषा हा नवी श्रेणी काढण्याचा निर्णय 12 ऑक्टोबर 2004 ला घेण्यात आला. त्यात तामिळ भाषेला पहिल्यांदा हा दर्जा देण्यात आला.

एखादी भाषा अभिजात होण्यासाठी काही नियम घालून देण्यात आले होते.

साईड इन्कम कुणाला नका असते....हवीच असते मग सुरुवात करा

एखादी भाषा 'अभिजात' कशी ठरते?

कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. गृह मंत्रालयाने 2005 साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले. त्याचे काय निकष आहेत?

• भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा.

• प्राचीन साहित्य हवं, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं.

• दुसर्‍या भाषासमूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी.

• 'अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.

भारतात आत्ताच्या घडीला 6 भाषांना अभिजात दर्जा मिळाला होता. तामिळ (2004), संस्कृत (2005), कन्नड (2008), तेलुगु (2008), मल्याळम (2013) आणि ओडिया (2014)

मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी काय संघर्ष करावा लागला?

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा संघर्ष हा आजचा नाही. मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी 2012 साली प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली होती.

2013 साली या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला. महारट्ठी-महरट्ठी-मऱ्हाटी-मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असं या अहवालात म्हटलं आहे. महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्षं जुनं असल्याचे पुरावे असल्याचं या अहवालात म्हटलं होतं.

कर्जाची गरज आहे, मग धावधाव नको..इथे सोय आहे

अकरा कोटी लोकांची मराठी जगातली 10 व्या ते 15 व्या क्रमांकाची भाषा आहे. देशातली ती एक महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे. तिच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ देत आणि विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून तिचं अभिजातपण स्वयंसिद्ध आहे असंही या अहवालात म्हटलं होतं.

अभिजात दर्जाने काय बदल होतात?

एखाद्या भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर काय लाभ होतात? आणि आतापर्यंत ज्या भाषांना हा दर्जा दिलाय त्यांना यातले कोणते लाभ दिले गेले याबद्दल 2016 साली सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितलं होतं की संस्कृत, तामिळ, कन्नड, तेलुगु या भाषांसाठी काही संस्था उभारल्या गेल्या आहेत.

तसंच या भाषांमधल्या प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतूदही केली गेली होती. यात प्रत्येक भाषेसाठी दरवर्षी काही कोटी रुपये दिले गेले होते.

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आपल्या वेबसाईटवर अभिजात दर्जा मिळण्याचे भाषा संवर्धनासाठी काय फायदे सांगितले आहेत

मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणं

भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं

प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं

महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करणं

मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणं

केंद्र सरकारने आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की मराठीला आणि अन्य भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे नोकरीच्या संधीत वाढ होतील. विशेषत: सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर संवर्धन, माहिती गोळा करणं, या भाषांमधील पुरातन साहित्याचं डिजिटायझेशन यामुळे भाषांतर, नोंद, विविध साहित्याचं प्रकाशन तसंच डिजिटल माध्यमात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

केंद्र सरकारच्या आजच्या निर्णयामुळे महाराष्ट्र (मराठी), बिहार, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश (पाली आणि प्राकृत), पश्चिम बंगाल (बंगाली), आसाम (आसामी) या राज्यांवर या निर्णयाचा प्रभाव पडेल. मात्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या निर्णयाचा दूरगामी परिणाम होईल.

source - bbcmarathi

Post a Comment

0 Comments