Header Ads Widget

shinde vs thackeray : शिंदेंची शिवसेना जोरात, ठाकरेंच्या शिवसेनेला बसणार फटका


shinde vs thackeray :  शिंदेंची शिवसेना जोरात, ठाकरेंच्या शिवसेनेला बसणार फटका

विशेष प्रतिनिधी

आडिवरे - विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले असून  पक्षप्रवेशांना प्राधान्य दिले जात आहे. लांजा - राजापूर - साखरपा मतदारसंघातही राजकीय रणनीतीला सुरुवात झाली असून थोड्याच दिवसात राजकीय धुमाळी सुरू होईल.

पैसे हवेत, येथे भेट द्या

राजापूर तालुक्यातील अनेक वाड्यांमधील ग्रामस्थ शिवबंधनांचा धागा सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योजक किरण सामंत आणि तालुकाप्रमुख दीपक नागले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश प्रवेश करत आहेत. 

पैसे कमवायचे आहेत, येथे भेट द्या

लवकरच विधानसभा निवडणुका होतील. गेल्या विधानसभा निवडणुकीत लांजा - राजापूर - साखरपा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांचा विजय झाला होता. मात्र यावेळी त्यांच्यासमोर शिंदेंच्या शिवसेनेचे मोठे आव्हान असणार आहे.

कर्ज हवंय, मग येथे भेट द्या

त्यातच काँग्रेसचे अविनाश लाडही निवडूक लढवण्याची चर्चा असल्याने लांजा - राजापूर - साखरपा विधानसभा मतदारसंघात कडवी लढत होण्याची शक्यता आहे,  मात्र महाविकास आघाडी या मतदारसंघात कोणता उमेदवार देणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Post a Comment

0 Comments