Header Ads Widget

#dharmvir2 #धर्मवीर2

dharmvir2 : धर्मवीर2 



दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यात असताना, एका गावातल्या तरुण कार्यकर्त्याने विचारलं की आनंद दिघेंवर एखादं पुस्तक आहे का? ठाण्याबाहेर फारशा माहीत नसणाऱ्या आनंद दिघेंचं मिथक महाराष्ट्रभर तयार करण्यात धर्मवीर सिनेमाचा पहिला भाग यशस्वी झाला, हे कळलं. 

आता दुसरा भाग येतोय. तो सिनेमा म्हणून आणि समकालीन इतिहासाचं डॉक्युमेंटेशन म्हणून पहिल्या भागापेक्षा बोगस असेल, याविषयी शंका नसावी. त्याचा डायरेक्टर प्रवीण तरडे असल्यामुळे आणखी काय अपेक्षा ठेवणार? ज्यांना पहिला भाग आवडला असेल, त्यांनी पुढची पोस्ट वाचूच नये. 

अवश्य भेट द्या

प्रवीण तरडे हा कट्टर संघवाला. मुरलीधर मोहोळांचा नातेवाईक आल्याचं सांगतात, अर्थात मराठा असावा. म्हणजे पुण्यातला मराठा संघवाला. त्याची बांग मोठीच असणार. त्याने संघाचं नरेटिव पहिल्या भागात यशस्वीपणे मांडलं. देवेंद्र फडणवीस काल म्हणाले की धर्मवीर ३ चं स्क्रिप्ट मी लिहिणार आहे. तिसऱ्याची कशाला, पहिल्या दोन्ही भागांची स्क्रिप्ट त्यांनीच लिहिलेली आहे. दुसऱ्याच्या तर पडद्यामागच्या सिनेमाचीही. 

पहिल्या भागात दाखवला तसा दिघेंचा मुख्य संघर्ष हा काँग्रेसशी किंवा वसंत डावखरेंशी नव्हताच. तो फक्त वरवर दिसत होता. संघर्ष मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीच होता. ठाण्यातली खासदारकीपासून कल्याण डोंबिवलीच्या नगराध्यक्ष-महापौरपदापर्यंतची बरीचशी शहरी सत्तास्थानं ही भाजपकडे आणि त्यातही कट्टर संघवाल्यांकडे होती. भाजपपेक्षा मोठी हिंदुत्वाची राळ उठवत दिघेंनी ती शिवसेनेकडे खेचून आणली. ती कशी आणली, हा खरा इंटरेस्टिंग भाग आहे. त्यावर भारी वेबसिरीज होऊ शकते. 

साईट इन्कम कमवायची आहे ? मग येथे भेट द्या

आज डावखरेंचा मुलगा फडणवीसांचा ठाण्यातला राईट हँड आहे. हे उगाच होत नाही. डावखरे आणि संघ या दिघेंच्या जुन्या विरोधकांची पुढची पिढी एकत्र आली, इतकाच त्याचा अर्थ आहे. 

चित्पावन ब्राह्मण  विरुद्ध सीकेपी म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू यांच्यात इतिहासकाळापासून कट्टर वैर आहे. दिघे सीकेपी होते. त्या वैराची ती ठाण्यातली लोकल आधुनिक काळातली आवृत्ती होती. दिघेंनी मो.दा. जोशी, प्रकाश परांजपे अशा ब्राह्मण मंडळींना हाताशी धरून संघाचं वर्चस्व हुशारीने मोडून काढलं. दिघे शाक्त होते, हाही एक पदर समजून घेण्यासारखा आहे. 

एकनाथ शिंदे हे दिघेंचा वारसा चालवू शकत नाहीत. ते लोकांना दिलदारीने मदत वगैरे करतील. रात्रीचे दरबार भरवतील. सेलिब्रेटींना उपकारात ठेवतील. कार्यकर्ते सांभाळतील. पण दिघेंचं सामाजिक भान शिंदेंकडे नाही. शिवसेनेचं हिंदुत्व हे भाजपच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं आहे, हे त्यांना कळतच नाही. कुणाला शंका असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाचे कोल्हापूर अधिवेशनातले ठराव वाचावेत. शिंदेंनी शिवसेना सोडू नये म्हणून दिघेंनी त्यांना शपथ घ्यायला लावली होती, असं त्यांचे समर्थकच कालपर्यंत सांगत होते. ते सिनेमात दाखवलेलं दिसलं नाही. 

गेम खेळा, पैसे कमवा

सिनेमात दाखवलं तसं दिघेंनी बाळासाहेबांना गुरू बनवून पाय वगैरे धुतले असतीलच. बाळासाहेबांमधल्या व्यंगचित्रकाराने त्याकडे कसं बघितलं असेल, असं मला सिनेमा बघताना उगाचच वाटलं होतं. पण दिघेंचं प्रस्थ ठाण्याच्या बाहेर जाऊ नये यासाठी बाळासाहेबांनी पॉवर पॉलिटिक्स केलंच. दिघे स्वतःला ठाणे शिवसेनाप्रमुख म्हणवून घ्यायचे. ते बाळासाहेबांनी बंद करायला लावलं. दिघेंना बॅलन्स करण्यासाठी ठाणे शहरात सतीश प्रधान, अनंत तरे यांना तर जिल्ह्यात गणेश नाईक, साबिरभाई शेख यांना बळ दिलं. यापैकी काहीजणांना नेते, उपनेते ही पदं दिली. शिवसेनेच्या संघटनेत ही पदं महत्त्वाची आहेत. 

दिघेंना मुख्य संघटनेत स्थान मिळालं नाही. क्लेम असूनही नेता हे पद मिळालं नाही. तरीही त्यांच्या बाळासाहेबांवरच्या निष्ठेला कधी भेग पडली नाही. कारण त्यामागे एक स्पष्ट विचार होता. सर्वच पक्षात त्यांचे जवळचे मित्र होते. शरद पवारांचा शब्द ते खाली पडू देत नसत, हे मी पत्रकार म्हणून बघितलंय. माझ्या आधीच्या पिढीच्या पत्रकारांनी तर बऱ्याच गोष्टी पाहिल्या असतील. 

सहज घाईघाईत लिहून टाकलंय. काही पदांचे, सिनेमातल्या सीनचे संदर्भ चुकले असू शकतील. पण तो तपशिलातला भाग झाला. गाभ्यात सांगयचं ते नीट आहे.

सौजन्य आणि साभार

सचिन परब

(सचिन परब यांच्या फेसबुक पोस्टवरून साभार)

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

#dharmvir2 #धर्मवीर2

Post a Comment

0 Comments