RAJ THACKERAY LADAKI BAHIN YOJNA : लाडकी बहीण योजना, राज यांचा टोमणा
गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जोरात आणि जोमाने सुरू आहे. लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा होतात. राज्यातील बहिणींनी या योजनेला प्रतिसाद देत लाडक्या भावाचे राजकीय वजन वाढवल्याची चर्चा सुरू आहेत. त्यातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांनीही या योजनेवरून बहिणींच्या भावावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडली नाही. तसे म्हटले तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही विरोधकांच्या टीकेची बहीण असे काहीसे समीकरण झाले आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारकडून मतांसाठी लाच दिली आत असल्याची टीका केली. विरोधकांकडून जोरदार टीका होत असतानाही राजकीय भाऊराया काय दाद देत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना उचलून धरली आहेत. विरोधकांनी कितीही विरोध केला तरी लाडकी बहीण योजना जोमाने रेटून नेण्याचे प्रयत्न सरकार पातळीवर केले जात आहे. मात्र त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमरावतीत अनौपचारिक चर्चेत लाडकी बहीण योजनेबाबत मनसे मत मांडले. त्यामुळे लाडकी बहीण योजनेबाबत शंका घेण्यास आणखी वाव मिळाला.
मनसे अध्यक्ष ठाकरे काय म्हणाले ?
'जानेवारीत पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत.' असे म्हणत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'सरकारच्या ओवाळणी'वर आसूड ओढले. या योजनेमुळे राज्य खड्ड्यात घातले जात असेल तर ते चुकीचे आहेत असे म्हणत सरकारच्या योजनेवर बोट ठेवत निशाणा साधला. महिलांना अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणण्याचा सल्लाही त्यांनी दिला. एकूण राज ठाकरे यांनी सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर ताशेरेच ओढले आहेत. त्याचबरोबर समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही असे म्हणत राज ठाकरे यांनी मर्मावर बोट ठेवले. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात पडसादच नव्हे तर राजकीय भूकंप होऊ लागले. अनेकांनी राज ठाकरे यांच्यावर मेघगर्जनेसारखी टीका केली.
लाडकी बहीण योजनेर राज ठाकरे बरसले म्हटल्यावर सरकारनेही बाह्या सरसावल्या आहेत. राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून टीका केली असेल तर हा महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांचा अपमान आहे, असे म्हणत अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे यांच्या लाडकी बहीण योजनेवरील भाष्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. आता अडची कोटी महिलांचा भाऊराया काय भूमिका घेणार, याकडे मनसेसह अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
0 Comments