BARSU REFINERY : आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी 'रिफायनरी समर्थकांचा खेळ ?', विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'राजकीय मेळ'
विशेष प्रतिनिधी
राजापूर - गेल्या अनेक महिन्यांपासून रिफायनरी प्रकल्पावरून कोकण धगधगत आहे. राजापूर तालुक्यातील बारसूमधील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. या प्रकल्पाविरोधात स्थानिकांना आंदोलनेही केली. रिफायनरी विरोधातील भूमिकेकडे लक्ष वेधण्यासाठी राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही नागपुरात आंदोलन करण्यात आले. बारसूतील रिफायनरी प्रकल्पाबाबत प्रत्येक पक्षाच्या भूमिका या पूर्णपणे स्पष्ट नसल्याने पेचही निर्माण झाले आहेत. रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन केल्याने स्थानिकांवर लाठीमारही करण्यात आला होता तर काही आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र आता प्रकल्प समर्थक आहेत तेच आता आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी पुढाकार घेत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
पैसे मिळत नाहीत ? येथे प्रयत्न करा
बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध कायम आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून राजकीय हालचाली नसतानाच आताच राजकीय हालचाली सुरू झाल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यातच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी रिफायनरी समर्थकच पुढाकार घेत असल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.
लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत रिफायनरी विरोधकांच्या आंदोलनाचा फटका बसू नये यासाठी राजकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. आंदोलन होऊन अनेक महिने झाले. आंदोलकांनी मुख्यमंत्री शिंदेंनाही भेटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या गाड्या अडवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता आंदोलकांवरील गुन्हे त्याच वेळी मागे का घेतले नाहीत आणि आता गुन्हे मागे घेण्यासाठी का प्रयत्न केले जात आहेत, अशाही चर्चा आहेत.
बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प सुरु करण्यासाठी मातीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी स्थाननिकांनी पुन्हा आंदोलन केले होते. या आंदोलनाला आसपासच्या गावांतील ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता आणि प्रकल्पाला विरोध केला होता. त्याचबरबोर एप्रिल २०२२मध्ये ग्रुपग्रामपंचायतीने जनमत चाचणी घेऊन रिफानरी प्रकल्प होऊ नये असा ठराव मंजूर केला होता. त्यामुळे आंदोलकांवरील गुन्हे माग घेण्याचे देण्यात येणारे आश्वासन हा राजकीय डावपेच तर नाही ना आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आंदोलकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न तर नाही, अशी चर्चा रत्नागिरी जिल्ह्यात सुरु आहे.
0 Comments