Header Ads Widget

pitrpandharavadyata : पितृ पंधरवडा - करा शुभ कार्याची सुरुवात


pitrpandharavadyata : पितृ पंधरवडा - करा शुभ कार्याची सुरुवात

पितृपंधरवडा चालू होतोय. अनेक लोक इतर पंधरवड्यात शुभकार्य करू नये अशा मताचे असतात.  त्यासाठी ते वैयक्तिक अनुभवांचे दाखले देतात अथवा पितृ पंधरवड्यात नवीन कार्य किंवा शुभकार्य करू नये अशा समजुतीचा आधार घेतात. माझा शास्त्रांचा फारसा अभ्यास नाही , थोडा फार ही नाही. मी माझ्या वकुबाप्रमाणे प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावत असतो. माझ्या दृष्टीने तरी पितृ-पंधरवड्यात कुठलेही शुभ कार्य करण्यास किंवा कुठलेही नवीन गोष्टीची सुरुवात करण्यास काहीही हरकत नाही कारण आपल्या पितरांची आपल्या बाबत कधीही वाईट इच्छा असेल का ?.  एखाद्याने आपल्या आई-वडिलांचा जिवंतपणे छळ केला असेल तरीसुद्धा मृत्यूनंतरदेखील ते आई - वडील आपल्या मुला-मुलींचे भले व्हावे अशीच इच्छा कायम प्रदर्शित करणार. 

पार्ट टाईम कमाई

मागे वृद्धाश्रमातील धायगुडे आजींचा खर्च मी लोकवर्गणीतून भागवला. त्यांची मुले त्यांना विचारत नव्हती. पण कधीही आजींच्या तोंडून आपली मुले नातवंडे यांच्या बद्दल वाईट उद्गार आले नाहीत. क्वचित प्रसंगी कोणी नातेवाईक भेटायला आलेच तर त्या सगळ्यांना भरपूर आशीर्वादच द्यायच्या. ही आपली संस्कृतीच आहे. त्यामुळे मृत्यूनंतरदेखील कोणीही आपल्या मुला - मुलींचे वाईट व्हावे असे कदापिही चिंतन करेल असे वाटत नाही अशी माझी वैयक्तिक धारण आहे. 

पैशांची चणचण, भेट द्या, दूर होईल वणवण

पितृपंधरवडा हा पूर्णपणे आपल्या पूर्वजांचे स्मरण करून, त्यांच्या आयुष्यातील घटनांपासून बोध घेऊन त्याप्रमाणे आपल्या जीवनाची मार्गक्रमण करावी यासाठीचे पंधरावडा हे आयोजन आहे असे मला वाटतेय. ह्या कालावधीत आपल्या पूर्वजांच्या प्रतिमेसमोर आपण उभे राहून त्यांच्या जीवनाचा आढावा घेतला तर त्यांच्या आयुष्यात काय घटना घडल्या,  त्याप्रसंगी ते कसे वागले,  त्यांच्या काय चुका झाल्या?  त्यांची अॅडवांटेज काय होती ? त्यामुळे आपल्या कुटुंबावर काय परिणाम झाले? आपल्या पूर्वजांनी त्यांचे नातेसंबंध कसे जोपासले या गोष्टींची उजळणी होत असते किंवा आपण ती उजळणी केली पाहिजे म्हणजे आपल्याला आपल्या जीवनातील वाट दिसेल.  त्यांच्याकडून झालेल्या चुका आपण दुरुस्त करून आपल्या जीवनात पुढील मार्गक्रमण करू शकतो. आपल्या पूर्वजांनी कशा प्रकारे प्रॉपर्टी उभी केली, आता आपण त्यात कशी भर घातली पाहिजे, याचाही विचार आपण करू शकतो.  तसेच आपल्या पूर्वजांचा घरोबा कोणत्या घराण्याची होता त्यांच्याशी आपण पुन्हा नव्याने संबंध प्रस्थापित करू शकतो आणि आपले सर्कल वाढवू शकतो अशा विचारमंथनातून आपली स्वतःची सुद्धा खूप डेव्हलपमेंट होऊ शकते अशी माझी  धारणा आहे. मग अशा आत्मपरीक्षणाच्या कालावधीत कोणतेही शुभकार्य करू नये, नव्याने सुरुवात करू नये, असे कोणी ठरवले असेल  तर माझ्या मनाला तरी हे मान्य नाही . पक्ष पंधरवड्याचे काळात आपली नित्य कर्म चालू असतात. आपण जेवतो, गोड खातो  तिखट खातो, बाहेर जेवतो, हॉटेलिंग करतो, बायकोला चिकटतो, सेक्स करतो, या सगळ्यावर मग निर्बंध का नाही  ? 

कर्ज सहज उपलब्ध

समजा पक्ष पंधरवड्यात एखाद्याच्या घरात मूल जन्माला आले किंवा अगदी सर्वपित्री अमावस्यालाच एखाद मूल जन्माला आले तर ती मुले काय ओढ्यात टाकून द्यायची का? ही मुले अशुभ आहेत असे समजायचे का?  ह्याच कालावधीत जर आपण आजारी पडलो तर डॉक्टर कडे जाऊन औषध घेतोस ना?  हॉस्पिटलला ऍडमिट होतोच ना?  मग बाकीच्या गोष्टी करण्यासाठी स्वतःलाच बंधने का घालून घ्यायची?  आपल्या कसोटीवर या गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत असे मला वाटते.  या कालावधीत आपण झोमॅटो वरून हॉटेलतील पदार्थ मागवतोय किंवा हॉटेलला जातोय, नाश्ता करतोय, जेवतोय, या कालावधीत पगार झाला तर आपल्या खात्यात जमा होतोय,  एखाद्याकडून पैसे इच्छित असतील तर ते आपण स्वीकारतोय, बँकांचे व्यवहार करतोय , गरज पडली तर नवीन कपडे खरेदी करतोय,  प्रवास करतोय , गावाला जातोय , शेअर्सचा डिव्हिडंट म्हणजे लाभांश आला  तरी आपण स्वीकारतोय.  मग नवीन घर घ्यायला नवीन प्लॉट घ्यायला किंवा त्याची बोलणी करायला या कालावधीत काय हरकत आहे ? काहीतरी गुळचट कल्पनांना कवटाळून बसायचं आणि आलेला गोल्डन चान्स सोडायचा याला मी मूर्खपणा समजतो.  एखादी प्रॉपर्टी आपण खरेदी करत असतो तेव्हा ती नुसती प्रॉपर्टी नसते तर ती प्रोस्परिटी असते . मग पक्ष पंधरवडा आहे म्हणून प्रॉपर्टीची बोलणी थांबवण्यात काय शहाणपणा आहे किंवा एखादा दस्त नोंदवायला काय अडचण आहे ? या कालावधीत नेहमीची व्यसने करताच ना,  तंबाखू खातात, सिगरेट ओढता, गुटखा खाता, मावा खाता, दारू पिता,  याच्या पेक्षा जास्त जे काही करत असेल तर तो देखील उंबरा ओलांडून ते जाऊन करून येतो,  मग त्याला पक्ष पंधरवड्याचे नियम लागू होत नाही का ? 

कोणतीही जोखीम नाही, खेळा आणि कमवा

कोणत्याही गोष्टीकडे आपण डोळस नजरेने पाहायला पाहिजे. देव आहे का नाही मला माहीूत नाही पण मी गुरुचरित्र पारायण करतो. देवावर रागावतो. मग परत त्याची भक्ती करतो.  मी गुरुचरित्र पारायण करताना ज्यात नमूद केलेले कुठलेही म्हणजे कुठलेही नियम पाळत नाही कारण मला एक कळते की मी मनाने प्रामाणिक आहे. व्यवहारात मी प्रामाणिक आहे. मी कोणाला घोडा लावला नाही. कोणाचे पैसे खाल्ले नाही. मला पाहिजे तसंच मी गुरुचरित्र वाचेन आणि मी माझ्या म्हणण्याप्रमाणेच असतो.  मी गुरुचरित्र पारायणाच्या कालावधीत परगावी प्रवास करतो,  हॉटेलमध्ये जातो, मला ते बाहेर खावेच लागते कारण माझ्या कामाच्या वेळा अनियमित आहेत किंवा मला माझ्या सगळ्या मीटिंग माझ्या ऑफिसमध्ये घेता येत नाहीत. बाहेरच घ्यावे लागतात, मग ते एखाद्या हॉटेलमध्ये होतात.  तिथे काहीतरी बाहेरचे खाणे पिणे होते . माझे गुरुचरित्र पारायण चालू आहे मी बाहेरचे खाणार नाही असे सांगून कसे चालेल?  मग मी माझ्या सोयीनुसार नियम बदलून घेतलेले आहेत आणि त्यात मी काही चुकतोय अशी माझी अजिबात धारणा नाहीये, सध्या तरी माझ्या मते मी कर्मफल सिद्धांताला मानतो . कर चंगा तो हो चंगा. अगोदर चांगलं केलं तर आपलं चांगलं होईल अशी माझी धारणा आहे.  अनेक लोक पैसे खातात. लोकांना लुबाडतात पण त्यांची मुलं मात्र निर्व्यसनी असतात.  त्यांची मुलं उत्तम शिकतात ,आई बापाला मरस्तोर सांभाळतात. प्रॉपर्टीत भर घालतात.  याउलट  निर्व्यसनी असलेल्या, कधी कोणाच्या वाळलेल्या पाल्यावर पाय न ठेवलेल्या माणसाचे मात्र म्हातारपणी हाल होतात.  कोणाला अंथरुणाला  खेळून राहावे लागते . हाग मूत्र दुसऱ्यांना काढावा लागत.  कर्जबाजारी होतो. पक्षघाताने लुळा पांगळा होतो. या गोष्टींना तुम्ही काय म्हणाल ? तेव्हा या पक्ष पंधरवड्यात आपल्या आई-वडिलांच्या किंवा आजी-आजोबांच्या नावे एखाद्या शाळेत एक रक्कम भरून बक्षीस योजना चालू करणे किंवा शिष्यवृत्ती चालू करणे, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एखादा अनाथाश्रम वृद्धाश्रम यातील गरजूंना मदत करणे किंवा आश्रम शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे.  अनेक रुग्ण असेही असतात की ज्यांना पैशाची गरज असते पण बोलता येत नाही असे रुग्ण हुडकून त्यांना काही आर्थिक मदत करणे अशी अनेक कामे आपण इतरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ करू शकतो.  

गाणं ऐकता ऐकता पैसे कमवा

हा पंधरवडा सर्वार्थाने चांगलाच असतो.

लेखक - अज्ञात

सौजन्यासह

Post a Comment

0 Comments