vishveshwar temple dahulvalli : श्री विश्वेश्वर मंदिर धाऊलवल्ली
धनवल्लीची धाऊलवल्ली झाली
राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली हे राजापूरपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे, सुमारे तीन ते साडेतीन हजार लोक वस्तीचे, नदीच्या दुतर्फा वस्ती असलेले आणि ६-७ कि.मी.लांबी असलेले गाव आहे. पूर्वी ते "धनवल्ली" म्हणून ओळखले जात असे. येथे प्रथम बाबदेव महाजनी गोखले यांनी शके १३४३ च्या सुमारास वसाहत केली. गावातील श्री विश्वेश्वर मंदिर पुरातन असून त्याची स्थापना गोखले वंशजांनी केली.
सर्व सोंगं करता येतात, मात्र पैशांचं नाही
श्री विश्वेश्वर मंदिराच्या निर्मितीचा इतिहास रंजक आहे. हा गोखले वंशजांच्या मूळ पुरुषाच्या निर्धाराचा, कर्तबगारीचा, जिद्दीचा इतिहास आहे. त्यावेळी धाऊलवल्लीमध्ये श्री शंकराचे मंदिर नव्हते. त्यामुळे शंकराच्या दर्शनासाठी लोक जवळच्या नाटेगावी जात असत. श्री शंकराचे देवालय आपल्या गावात बांधण्याचा निर्धार त्याच वेळी पोमदेव मानी यांनी केला. जमलेल्या मंडळीने त्याला होकारही दिला. नारळासमोर प्रार्थना झाली. देवाचे लिंग साळशी महाल येथून आणण्यात आले. मंदिर पूर्ण होईपर्यंत अन्नस्पर्श करणार नाही. असा त्यांनी निर्धार केला. पोमदेव मानी गोखले उपोषण करत बसले. तीन महिन्यांनी मंदिराचे काम पूर्ण झाले. देवाच्या पूजेसाठी लिंगायत आणण्यात आले. बाळाजी महादेव गोखले यांचे आजोबा मोरो दामोदर गोखले यांनी आपल्या घराण्याविषयी लिहिलेल्या टिपणांत याचा उल्लेख आढळतो.
पैशांची गरज आहे, अवश्य भेट द्या....
गावातील नदीच्या काठी शांत परिसरात हे मंदिर आहे. मंदिराचे प्रवेशद्वारावर पूर्वी नगारखाना होता. मंदिरासमोर मानाप्रमाणे सात दीपमाळा (त्रिपुर) आहेत. मंदिरात एक लाकडी कोरीव पाटीवर सुताराने कोरलेला लेख आहे, "श्री शके १६५१ राक्षस नाम संवत्सरे फाल्गुन शुद्ध ८ हिंदूवारे तदीने देवालय श्री विश्वेश्वराचे कर्ता राजश्री पोमदेव महाजनी, वीस महाजनी, नान महाजनी, कृष्ण महाजनी, बाबदेव महाजनी, महादेव महाजनी पारकर हजरबंद काम सुतारे वाडये". आजही तो लेख जतन करुन ठेवला आहे.
परंपरेने गावची मुख्य खोती गोखले वंशज यांचेकडे आणि जोग, काळे यांच्याकडे आहे. मंदिरात शिवरात्रोत्सव, वसंत पूजा, देवाची होळी आनंदाने साजरी होते. चैत्र पौर्णिमेला देवाचा वाढदिवस भक्तिभावाने साजरा होतो. पूर्वी उत्सवाच्या वेळी दशावतारी लोकनाट्य सादर केले जात असे. आता मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. आणखी काही सुधारणा होऊ घातल्या आहेत. भक्त मंडळींना मंदिरातील सुधारणांसाठी मदतीचे आवाहनही केले जाते. संपूर्ण गावाच्या पुढाकाराने नुकताच मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या शुभहस्ते अतिशय आनंदाने, भक्तिभावाने संपन्न झाला.
कुठेही पैसे मिळत नाही, मग भेट द्या.....
धाऊलवल्ली गावची खासियत म्हणावी लागेल की रस्त्याच्या कडेला दगडी रेखीव बांधकाम केलेले वडपिंपळाचे पार आहेत. ही संख्या सुमारे ३५ ते ४० च्या आसपास आहे. वाटसरूला सावली मिळावी, पशु-पक्ष्यांना निवारा, सावली तसेच वातावरण प्रसन्न राहावे, असा उदात्त हेतू निसर्गप्रेमी पूर्वजांकडे दिसून येतो.
साभार
शब्द संकलन
श्री.संजय द. गोरे
धाऊलवल्ली, राजापूर.
0 Comments