Header Ads Widget

dhaulvalli school : व्यावसायिक शिक्षण काळाची गरज


dhaulvalli school : व्यावसायिक शिक्षण काळाची गरज

- संदीप शेमणकर

राजापूर - राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली येथील कै. सौ. आनंदीबाई कृष्णाजी गोखले माध्यमिक विद्यालय, धाऊलवल्ली येथे पूर्व व्यवसाय शिक्षण (MSAT) तील गृहआरोग्य विभागाने "किचन कट्टा" या घटकात खमंग नानकटाई तयार केली. 

प्रशालेतील गृहआरोग्य विभागाच्या निदेशिका अश्विनी राणे यांनी किचन कट्टा घटकात मुलांना खमंग नानकटाई कशी करावी ? याचे उत्तम प्रात्यक्षिक करून दाखविले आणि मुलांकडून उत्तम अशी नानकटाई बनवूनही घेतली.

कर्ज घ्या, बिझनेस वाढवा...कसा?

महत्त्वाची बाब म्हणजे हा अभ्यासक्रम राबवत असताना प्रशालेतील विद्यार्थी ही उत्तम प्रकारे कुकचे काम करतात. विद्यार्थिनी तर करतातच, मात्र विद्यार्थी ही आवडीने सहभाग घेतात. यात केक, शेंगदाणा, लाडू, चिक्की, राजगिरा लाडू, सॅलेड, सॅण्डवीच, खजूर चटणी, टॉमेटो सॉस, तिळगूळ असे नामाविध पदार्थ शिकविले जातात. त्यामुळे किचन कसे सांभाळावे ? साहित्य कसे हाताळावे ? तसेच छोट्या-छोट्या टिप्स सांगितल्या जातात. मुलांवर वेळप्रसंगी घरी उपाशी राहण्याची वेळ येत नाही. आयटीआय आणि हॉटेल मॅनेजमेंटचा हा प्रथमदर्शी पाया असून तिथे हा अभ्यासक्रम घेतलेल्या मुलांना आरक्षण आहे. आरक्षणाचा फायदा आज पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी घेतही आहेत.

तयार झालेल्या मालाचा खर्च आणि त्याचा विक्री दर कसा ठरवावा हेही मुलांना शिकविले जाते. यातून छोटे - मोठे उद्योग कसे करावे ? याचे ज्ञान मुलांना होते. संस्था अध्यक्ष एस.आर.गोखले, चेअरमन के. पी. गोखले तसेच समस्त धाऊलवल्ली ग्रामविकास मंडळ पदाधिकारी यांनी अशा प्रकारच्या व्यवसाय शिक्षणाची मुहूर्तमेढ शालेय अभ्यासक्रमात रोवून मुलांना भावी आयुष्यात स्वयंसिद्ध बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलून प्रशालेतील शिक्षण खूपच समृद्ध केले आहे.

किती दिवस दुसऱ्यांवर अवलंबून राहायचे ?

 कोकरे एस.आर. हे या विभागाचे प्रमुख असून ते हा विभाग उत्तमरीत्या सांभाळत आहेत. मुख्याध्यापिका हरचेकर आणि सहाय्यक शिक्षिका हळदणकर यांचे वेळोवेळी मोलाचे सहकार्य लाभते. काही माजी विद्यार्थी व्यवसाय शिक्षण (MSAT) चे घेऊन गावातच स्वतःचा व्यवसाय करत आहेत. गावातील लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहेत. या प्रशिक्षण उपक्रमाचे तालुका स्तरावर कौतुक केले जात आहे.


Post a Comment

0 Comments