Header Ads Widget

Rane vs Thackeray : राजे, राडा आणि राजकारण


Rane vs Thackeray  : राजे, राडा आणि राजकारण

ठाकरे आणि राणे गटात राजकोट किल्ल्यावर झाला तुफान राडा

Rane vs Thackeray Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ डिसेंबर २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केलं होतं. मात्र शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवभक्त कमालीचे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. हा पुतळा कोसळल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय घमासान सुरु आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी दौरा केला. यावेळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, जयंत पाटील आणि स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी राजकोट किल्ल्यावर घटनास्थळी भेट दिली.

याचदरम्यान भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांच्या समर्थकांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर ठाकरे गटाच्या समर्थकांनीही राणेंच्या कार्यकर्त्यांना जशाच तसं प्रत्युत्तर दिलं. दोन्ही गटात तुफान राडा झाल्यानं हाणामारी झाली. निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना किल्ल्याच्या परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली. त्यामुळे ठाकरे गटाचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. पोलिसांनी दोन्ही गटाच्या नेत्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. 

आदित्य ठाकरे काय म्हणाले? 

काही बालबुद्धीवाले नेते इथे आले होते. त्यांची बुद्धी उंचीएवढीच आहे. त्या लोकांनी असं करण्याचा प्रयत्न केला. भाजपवाल्यांना विचारा, त्यांच्याकडून काय आदर्श ठेवायचा?  माझ्या महाराष्ट्राला लुटत चालले आहेत. वेदांत फॉक्सकॉनसारखे प्रकल्प गुजराला नेत आहेत आणि इथे येऊन लढाई करतात, ही भाजप आहे का? वाजपेयी साहेबांची भाजप वेगळी होती. ही भाजप भ्रष्टाचारी जनता पक्ष झालेला आहे. 

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना सोमवारी (२६ ऑगस्ट) घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ डिसेंबर २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केलं होतं.  शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधी पक्षांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यासाठी राज्य सरकारकडून 2.36 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर नौदलाकडून या संदर्भात निरीक्षण करण्यात आलं. यासाठी लागणारी कागदपत्रे आणि परवानग्यांसाठी राज्य सरकारने नौदलाला सहकार्य केलं. सिंधुदुर्ग हे पर्यटन स्थळ असून ते राज्य सरकारच्या अखत्यारित आहे. या पर्यटनस्थळाची देखभाल करण्याचं काम स्थानिक संस्थांना देण्यात आलं होतं, अशी माहिती नौदलाच्या सूत्रांनी दिली होती.

भरपावसात ठाकरे कडाडले

Sindhudurga: राजकोट येथे गेलेल्या आदित्य ठाकरे आणि समर्थकांची राणेंच्या समर्थकांसोबत बराच राडा झाला. ज्यानंतर मालवणमध्ये केलेल्या भाषणात आदित्य ठाकरेंनी राणेंवर बरीच टीका केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा कोसळल्याचं वृत्त समोर येताच त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सिंधुदुर्गात आज (28 ऑगस्ट) मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचवेळी महाविकास आघाडीतील नेते राजकोट किल्ल्याची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले असताना तिथे राणे आणि ठाकरे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला.

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे हे आदित्य ठाकरे राजकोटवर पोहचण्याच्या काही मिनिटं आधी तिथे पोहचले होते. ज्यानंतर जवळजवळ तासभर राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा सुरू होता.

पण याच राड्यानंतर आदित्य ठाकरेंनी मालवणमध्ये जोरदार भाषण दिलं. एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असतानाही आदित्य ठाकरेंनी पुतळ्याच्या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर तुफान हल्ला चढवला

अरे ठेचून एक-एकाला रात्रभर मारुन टाकेन - नारायण राणे

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते प्रचंड आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत आहेत. राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे गटात तुफान राडा झाल्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे. या राड्यादरम्यान भाजप आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोलिसांसमोर खळबळजनक वक्तव्य केलं.

तो आमच्या एरियात आलाय... - निलेश राणे

हे सगळं प्रकरण अधिक चिघळू नये यासाठी सिंधुदुर्ग पोलीस हे प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस हे दोन्ही बाजूकडील लोकांना समजविण्याचा प्रयत्न करत होते. 

त्याचवेळी निलेश राणे थेट पोलिसांनाच म्हणाले की, 'आम्हाला विनंती करूच नका.. त्यांना बाहेर घेऊन जा.. आम्ही दिवसभर जाणार नाही.. तुम्ही आम्हाला ओळखता ना.. आम्ही दिवसभर जाणार नाही. तो (आदित्य ठाकरे) आमच्या एरियात आलाय... आम्ही त्याच्या अंगावर गेलो नाही.. दुसऱ्या दरवाजाने त्याला घेऊन जा.. एंट्री पहिली आमची झालीए.' असं म्हणत निलेश राणेंनी मुख्य द्वारातून बाहेर जाण्यास मनाई केली होती. 

पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आदित्य ठाकरे किल्ल्याच्या मुख्य द्वारातूनच पडले बाहेर

दरम्यान, सिंधुदुर्ग पोलिसांनी मध्यस्थीनंतर केल्यानंतर आदित्य ठाकरे हे राजकोट किल्ल्याच्या मुख्य द्वारातूनच बाहेर पडले. पण त्यावेळी देखील नारायण राणे आणि निलेश राणे हे बाजूला आपल्या समर्थकांसह उभे होते. तेव्हा इथे दोन्हीकडून बाजूने मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही झाली.

"साहेब, यापुढे आमच्या या जिल्ह्यात पोलिसांवरुद्ध असहकार्य असेल. आणि त्यांना येऊ दे.. तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या. मी बघतो.. अरे ठेचून एक-एकाला रात्रभर मारुन टाकेन... सोडणार नाही", अशी धमकी राणेंनी विरोधकांना दिली. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केलं आहे. नारायण राणे यांची बोलण्याची एक पद्धत आहे ते बोलताना आक्रमक आहेत पण कुणाला धमक्या देतील ते असं मला वाटत नाही, असं फडणवीस म्हणाले.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? 

राजकोट येथील घटनेवर कोणीही राजकारणात करू नये. सर्वांसाठी कमीपणा आणणारी घटना आहे. घटनेची सखोल चौकशी करून कारवाई करू. नेव्हीनेसुद्धा चौकशी समिती तयार केली. टीम तयार केली आहे. नेव्ही  या संदर्भात चौकशी करून उचित कारवाई करेल. जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करेल. या  घटनेकरता कुठली गोष्ट जबाबदार होती, काय चुका राहिल्या या संदर्भातला रिपोर्ट त्या ठिकाणी असेल.

सार्वजनिक बांधकाम विभागाने एक पोलीस तक्रार एफआयआर केलेली आहे. पोलीस विभाग कारवाई करेल सगळ्या प्रकारची कारवाई त्या ठिकाणी होणार आहे आणि दुसर म्हणजे  मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितल आहे की, आपण नेव्हीला मदत करून त्यांच्या मदतीने त्या ठिकाणी एक भव्य अशा प्रकारचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार आहोत. 

घटना झाल्यानंतर जे जे करण आवश्यक आहे ते केलं जात आहे. नेव्हीकडून सुद्धा करण्यात येत आहे, मात्र त्याचवेळी केवळ आणि केवळ याच राजकारण करायचं. हे जे काही विरोधकांनी सुरू केलेले आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढायचं प्रत्येक गोष्टीला इलेक्शनच्या, निवडणुकीच्या चष्म्यातून पाहायचं हे अत्यंत चुकीच आहे. अशा प्रकारचं खालचं राजकारण त्यांनी करू नये.

मी  एवढेच सांगतो राज्य सरकार, नेव्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ज्या काही चुका झाल्या आहेत, त्या चुका पुन्हा घडणार नाही. ज्याने चुका केल्या त्यांना शासन होईल आणि छत्रपती शिवरायांचा भव्य असा पुतळा त्या ठिकाणी उभा राहील. या संदर्भातली कारवाई सुरू केली आहे. कोणी काय केलं, हे मी बोलणार नाही पण सगळ्यांनाच विनंती आहे, या विषयाचं राजकारण करणं महाराष्ट्राला शोभत नाही. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत त्यांना हे देखील माहिती आहे की, हा पुतळा नेव्हीने तयार केलेला आहे. हा काही राज्य सरकारने तयार केलेला नाही. विरोधकांच्याकडून हे राजकीय वक्तव्य केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केले जात आहे,

उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला दिला मोठा इशारा

Uddhav Thackeray Press Conference: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते प्रचंड आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत आहेत. राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे गटात तुफान राडा झाल्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारला इशारा दिला आहे. 

येत्या रविवारी म्हणजे १ तारखेला हुतात्मा स्मारकात वंदन करून तिथून आम्ही सर्वजण गेट वे ऑफ इंडियाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यसमोर आम्ही जमणार आहोत. तो पुतळा उभारून किती वर्ष झाली, तरीसुद्धा तो पुतळा मजबुतीनं उभा आहे. या सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी जोडो मारो हा कार्यक्रम आम्ही तिथे करणार आहोत. 

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय म्हणाले? 

"मी सर्व शिवप्रेमींना विनंती करतोय की, या सरकारचा जो कारभार चालला आहे, त्याचा निषेध करण्यासाठी त्यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावं. मालवणमध्ये ठाकरे-राणे गटात झालेल्या राड्याबाबत प्रतिक्रिया देतना उद्धव ठाकरे म्हणाले, हे आता कोकणवासीयांना कळलं असेल. कारण गेल्या लोकसभेच्या आधी ज्या पद्धतीनं मोदी तिथे आले होते, त्यावेळी सिंधुदुर्गच्या साक्षीने नौदल दिन साजरा केला गेला.

सर्वांना याचा अभिमान निश्चितपणे वाटला. आपण काहीतरी गाजवतोय आणि त्याचं श्रेय घ्यायचंय, म्हणून ढिसाळ घाईने जो पुतळा उभा केला गेला, त्याबाबतही आता सर्व गोष्टी उघड होत आहेत. तो शिल्पकार कोण होता? ती कंपनी कोणती होती. त्यामध्ये ठाणे कनेक्शन कसं होतं?" असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. 

या स्मारकाच्या कामातसुद्धा कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला आहे. ते सांगतात की वाईट घडल्यानंतर काहीतरी चांगलं घडणार. म्हणजेच पुन्हा एकदा पुतळा उभारण्याचा घाट घालणार. त्यातून पुन्हा टेंडर काढणार. त्या टेंडरमध्येही घोटाळा काढणार. यांच्या कारभाराची किळस यायला लागली आहे. हा किळसवाणा कारभार आहे, असं म्हणत ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

SOURCE - MUMBAI TAK

Post a Comment

0 Comments