sindhudurg food : सिंधुदुर्ग जिल्ह्यात फूड सिक्युरिटी आर्मी
सिंधुदुर्ग : केरळच्या धर्तीवर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात फूड सिक्युरिटी आर्मीची संकल्पना राबविण्यात आली आहे. या फूड सिक्युरिटी आर्मीचे जवान पुढील काळात शेतकऱ्यांच्या शेत आणि फळबागेत काम करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नवीन समृद्धी येईल, असा विश्वास रत्नसिंधू योजनेचे अध्यक्ष आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला येथे व्यक्त केला.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्यामार्फत आणि सिंधुरत्न योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या अन्नसुरक्षा दल यांच्यासोबत चर्चासत्र शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थित संपन्न झाले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत, सिंधुरत्न योजनेचे सुरज परब यांच्यासह फूड सिक्युरिटी आर्मीचे जवान उपस्थित होते.
0 Comments