राजापूर, लांजा, साखरपा विधानसभेच्या युवासेना संपर्कप्रमुख पदी संदेश मिठारी
- संदीप शेमणकर
राजापूर - युवासेनाप्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या सूचनेनुसार संदेश मिठारी यांची राजापूर-लांजा-साखरपा विधानसभेच्या युवासेना संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेना भवन, दादर मुंबई येथे आमदार राजन साळवी तसेच ओबीसी रत्नागिरी जिल्हा सेलचे अध्यक्ष पांडुरंग उपळकर यांच्या उपस्थितीत नियुक्तिपत्र संदेश मिठारी यांना देण्यात आले. यावेळी लांजा तालुका संपर्कप्रमुख जगदीश जुलूम, राजापूर तालुका संपर्कप्रमुख अनिल भोवड, संगमेश्वर तालुका संपर्कप्रमुख राजेश शेलार, शिवसहकारचे रत्नागिरी जिल्हा संघटक सुधीर मोरे तसेच अन्य मान्यवर, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.
0 Comments