lanja : वर्षश्राद्धनिमित्त प्रबोधनात्मक उपक्रम
लांजा - लांजा तालुक्यातील कै. सीताराम गोबरे यांच्या वर्षश्राद्धनिमित्त प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात आला. गोबरे कुटुंबीयांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरवली शाळेत वह्यांचे वाटप करून हा उपक्रम राबवला.
लांजा तालुक्यातील शिरवली येथे १० ऑगस्ट २०२४ रोजी कै. सीताराम गोबरे यांच्या वर्षश्राद्धनिमित्त वह्यावाटप उपक्रम करण्यात आला. कै. सीताराम गोबरे हे नेहमीच शैक्षणिक कार्यात योगदान करत असत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरवली या शाळेलाही त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने मदत केली होती. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयाकडून गणेश गोबरे, वैशाली गोबरे आणि महेश गोबरे यांच्यामार्फत शिरवली गावातील दोन्ही शाळांमध्ये वह्यावाटप करून कै. सीताराम गोबरे यांचा वारसा जपण्यात आला.
शाळेतील मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक गोतावडे, केसरकर, घोरपडे, दळवी, माटल आणि संदीप गोबरे उपस्थित होते. या उपक्रमाचे कौतुक गावपातळीवर होत असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत आहे. असा प्रबोधनात्मक उपक्रम राबवून एक आदर्श गोबरे कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला आहे.
0 Comments