congress avinash lad : ल. र. हातणकरांचे विचार पुढे नेणार - लाड
रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अविनाश लाड यांचा पाचलवासीयांशी संवाद
- संदीप शेमणकर
राजापूर - कै. आमदार ल. र. हातणकर हे कुणबी समाज नेते होते आणि त्यांच्या विचारांचा राजापूर - लांजा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे आपल्याला त्यांचे विचार पुढे घेऊन काम करायचे आहे, असे रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश लाड यांचा पाचलवासीयांशी संवाद साधताना सांगितले.
आपले प्रेम अनमोल आहे तसेच राजापूर मतदारसंघ हा काँग्रेसचा बाल्लेकिल्ला आहे. त्यामुळे कै. आमदार ल. र. हातणकर यांचे विचार पुढे नेऊन काम करायचे आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील रोजगाराचा प्रश्न सोडवायचा आहे आणि भविष्यात तो सोडवायचा आहे, असेही अविनाश लाड यांनी सांगितले.
आपण सर्वांनी लोकसभेला चांगले काम केले आहे. तसेच काम विधानसभा निवडणुकीच्या वेळी करायचे आहे, अशी सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केली. यावेळी व्यासपीठावर अनेक काँग्रेस मान्यवर उपस्थित होते. आमदार हस्नबानू खलिफे, रत्नागिरी जिल्हा सचिव संतोष गोताड, रत्नागिरी संपर्क सचिव राजेंद्र धुमक, राजापूर तालुका अध्यक्ष किशोर नारकर, लांजा तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्टे, लांजा युवक तालुका अध्यक्ष प्रतीक खरत, मंदार सप्रे, कुलकर्णी गुरुजी, शांताराम रोगे, अनंत तोरस्कर, विलास गागण, शिरीष सप्रे, सुरेश मोरे, सलीम प्रभुळकर, जितू खामकर यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना छत्रीवापट करण्यात आले.
0 Comments