आदर्श शाळा भडे नंबर १ शाळेला संगणक भेट
- संदीप शेमणकर
रत्नागिरी - जिल्हा परिषद आदर्श शाळा भडे नंबर एक शाळेला शासनाच्या 'मिशन आपुलकी'अंतर्गत तेंडुलकर बंधू भडे यांनी संगणक भेट दिली. सर्वोत्तम तेंडुलकर माजी सरपंच भडे आबाकाका तेंडुलकर आणि संदीप तेंडुलकर या सर्व बंधूंनी मिळून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा भडे नंबर १ला संगणक भेट दिली. यावेळी संदीप तेंडुलकर यांचा शाळेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ भेट देऊन मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमास प्रोत्साहन म्हणून तंत्रज्ञान वाढीसाठी ही भेट अनमोल ठरणार आहे. त्यांच्या या दातृत्वाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती भडे, शिक्षक पालक संघ भडे, शाळा आधार समिती भडे यांनी आभार व्यक्त केले. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक लीलाधर कुड, पोलीस पाटील प्रशांत बोरकर, माजी सरपंच संजयकुमार राऊत, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश रेवाळे, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
0 Comments