dhaulvalli gokhale school : गृहआरोग्य विभागाने रक्षाबंधनासाठी बनविल्या आकर्षक राख्या
आडिवरे - राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली गावातील कै. सौ. आनंदीबाई कृष्णाजी गोखले माध्यमिक विद्यालय, धाऊलवल्ली या शाळेतील पूर्व व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील गृहआरोग्य विभागाने रक्षाबंधनासाठी आकर्षक राख्या बनवल्या आहेत.
सदर अभ्यासक्रमात विविध उपक्रम राबविले जातात. राख्या बनविणे हा त्यातील एक उपक्रम आहे. दरवर्षी मुले हजार ते दीड हजार राख्या तयार करून त्याचे स्वतः मार्केटिंगही करतात. त्यातून मुलांना उत्पादन, मार्केटिंग कसे करावे याचे उत्तम शिक्षण दिले जाते. संस्थेने महत्वपूर्ण असा अभ्यासक्रम निवडून मुलांना स्वयंसिद्ध बनवित आहे. या विभागाचे कोकरे एस.आर. हे प्रमुख आहेत तर अश्विनी राणे या गृहआरोग्य विभागाच्या निर्देशिका आहेत.
मुख्याध्यापिका हरचकर यांचे मार्गदर्शन तसेच इतर तीन विभागांचे निर्देशक साळवी, आंबेलकर, पोकळे, हळदणकर या शिक्षक आणि सर्व कर्मचारी वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमात विद्यार्थी - विद्यार्थिनी आनंदाने सहभागी होतात आणि आनंद द्विगुणित करतात. धाऊलवल्ली आणि आसपास परिसरातील विविध स्तरातून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. नुसते पुस्तकी शिक्षण मिळत नसून संस्थेच्या वतीने व्यावसायिक दृष्टिकोनातून विद्यार्थी - विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले जाते.
![]() |
| जाहिरात - अभिज्ञान अकादमी |


0 Comments