dhaulvalli : धाऊलवल्ली गावात गांडूळ खतनिर्मिती
कै.सौ.आनंदीबाई गोखले माध्यमिक विद्यालय धाऊलवल्ली विद्यार्थ्यांचा पुढाकार
- संदीप शेमणकर
आडिवरे - राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली गावातील कै.सौ.आनंदीबाई कृष्णाजी गोखले माध्यमिक विद्यालय, धाऊलवल्ली येथे पूर्व व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील "शेती आणि पशुपालन" विभागात गांडूळ खतनिर्मिती उपक्रम राबविण्यात आला.
प्रशालेने पूर्व व्यवसाय शिक्षण म्हणजेच (MSAT) हा अभ्यासक्रम घेतला असून त्यात एकूण चार विभाग येतात. त्यापैकी शेती आणि पशुपालन विभाग हा निर्देशिका नीलम साळवी या पाहातात. त्यामध्ये भातशेती, हळद लागवड, आंबा-काजू कलम बांधणी, भाजीपाला, रोपवाटिका तसेच गांडूळ खत इत्यादी उपक्रम राबविले जातात.
अवश्य भेट द्या, महत्त्वाचं काम होऊ शकतं
वाढत्या आजारांमुळे सध्या सेंद्रिय शेतीला खूप महत्त्व दिले जातेय. मात्र लोक शेतीलाच विरसले आहेत. शेतीप्रधान देशात शेतीपासून दूर होत चाललेल्या संस्कृतीला पुन्हा एकदा शेतीचे महत्व कळावे आणि मुलांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण करून व्यवसायातून स्वतःच्या पायावर कसे उभे रहावे ? याचे महत्त्व विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमातून दिले जाते. कोरोना काळात शेतीचे महत्त्व सर्वांना समजले.
"सध्या शेती काय करते ?" या सदरात शेती विभाग गांडूळ खतनिर्मिती हाताळत आहे. यामध्ये गांडूळ खताचे पाच बेड असून उत्तम प्रतीचे शुद्ध जैविक गांडूळ खताचे उत्पादन घेतले जात आहे. विर्देशकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी स्वतः बेडची निगरानी करतात, तयार झालेले गांडूळ खत काढतात. वर्षभरात जवळ - जवळ 6 ते 7 टन गांडूळ खताचे उत्पादन या अभ्यासक्रमातून घेतले जाते.
ऐक्स्टा इन्कम...नक्की भेट द्या
खताचा रिपोर्ट ८ ते १० दिवसांत दिसू लागतो. याच गुणवत्तेमुळे आजूबाजूच्या परिसरातून आणि गावातून गांडूळ खताला टनात मागणी असते. त्यातून प्रशालेतील विद्यार्थी भविष्यात नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा छोटा-मोठा व्यवसाय करू शकतात. प्रत्यक्षात करतही आहेत. अशा प्रकारे गोखले संस्थेने दूरदर्शी विचार करून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यातील सधनतेसाठीचे सुवर्ण जलशालेय जीवनातच देऊन खूप मोठा दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजविला आहे.
सदर अभ्यासक्रम साळवी, राणे, आबेलकर, पोकळे हे चार निर्देशक पाहात आहेत. या विभागाचे सर्व कामकाज प्रशालेतील शिक्षक एस.आर.कोकरे हे पाहतात. प्रशालेच्या मुख्याध्यापिका हरचकर आणि सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभते.
0 Comments