भरपावसात गायलं मुंबई विद्यापीठाचं गीत
- संदीप शेमणकर
रत्नागिरी - लोकनेते शामरावजी पेजे कला , वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय शिवार आंबेरेअंतर्गत नेचर क्लब आणि आय. के. एस. विषयांतर्गत क्षेत्रभेटीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी दाभिळ आंबेरे गावाच्या जंगलामध्ये असलेला सर्वात उंच, डेरेदार आणि अनेक वर्षे दिशादर्शक म्हणून काम करणाऱ्या अशा सातवीण वृक्षाच्या क्षेत्राला भेट देण्यात आली. यावेळी मुंबई विद्यापीठाचे गीत गाऊन पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यासोबतच या क्षेत्राच्या जवळच असलेल्या वाघबीळ म्हणजेच वाघाच्या गुहेचे दर्शन घेण्यात आले.
अवश्य भेट द्या...पैसे गुंतवा, पैसे कमवा, धंद्यापाण्यासाठी कर्जही घ्या...अगदी सोपं
निसर्गातील विविध वृक्ष, औषधी वनस्पती, प्राणी, पक्षी ,फुले यांच्या निरीक्षणासह निसर्गाच्या सहवासात विद्यार्थ्यांना रमता यावे यासाठी या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सातवीण, करवंद ,कुडा, वावडिंग, हसोळ, भारंगी, टाकळा, शेवंती, सीतेची आसवे अशा अनेक वनस्पती, रानभाज्या, फुले, फळांच्या निरीक्षणपूर्वक नोंदी केल्या.
खेळा आणि जिंका...पैसे कमावण्याचा उत्तम मार्ग
निसर्गाच्या सहवासामध्ये विविध प्राचीन खेळ खेळून विद्यार्थ्यांनी खेळाची मजा घेतली. निसर्गाला हानी न पोहोचवता आणि प्लास्टिकचा वापर टाळून तसेच तिथला प्लास्टिक कचरा उचलून निसर्गाचे संवर्धन करण्याचा खारीचा वाटा विद्यार्थ्यानी उचलला.
त्यानंतर तिथेच वाहणाऱ्या ओहोळाजवळच बसून विद्यार्थ्यांनी सोबत आणलेला डबा सर्वांमध्ये वाटून खाल्ला. दिवसभर विद्यार्थ्यानी निसर्गाच्या सान्निध्यात राहून ही क्षेत्रभेट अविस्मरणीय ठरवली. यावेळी अनुष्का लिंगायत, समृद्धी कुड, अमित पवार हे प्राध्यापक आणि गोवर्धन मोहिते काका हे विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित होते.
0 Comments