मोफत वह्यावाटप : जिजाऊ शिक्षण संस्थेचा पुढाकार
- संदीप शेमणकर
रत्नागिरी - जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून शनिवार, ३१ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोंडवाडी, फणसवळे क्र. २ जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात आलं.
पैसे मिळत नाही, चिंता नको...अवश्य भेट द्या
जिजाऊ संस्थेचे रत्नागिरी विभागाचे कायदेशीर सल्लागार महेंद्र मांडवकर यांनी संस्थेच्या कार्याबद्दलची माहिती उपस्थितांना दिली. संस्थेच्या मोफत विविध उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहनही उपस्थितांना केले.
फुकट व्हिडिओ बघून वेळ का घालवता, गेम खेळा पैसा कमवा
याप्रसंगी जिजाऊ संस्था रत्नागिरी विभागाचे कायदेशीर सल्लागार महेंद्र मांडवकर, जिजाऊ संस्थेचे सदस्य मंदार नैकर, फणसवळे गावचे उपसरपंच गौरव नाखरेकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष आंबेकर, फणसवळे गावच्या पोलीस पाटील ऋतुजा आंबेकर, फणसवळे गावचे प्रतिष्ठित नागरिक राजेंद्र मुळे, मुकेश माने, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रेरणा ढवळे, शाळेच्या मुख्याध्यापिका रुचिता सुवरे, सहशिक्षिका रेश्मा यादव तसेच बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, महाराष्ट्र रत्नागिरी विभागमधील सदस्य उपस्थित होते.
0 Comments