पारंपरिक पद्धतीला फाटा, गृहप्रवेशाचा नवा पायंडा
विशेष प्रतिनिधी
विरार - कुणबी समाजात हळूहळू परिवर्तन होऊ लागले आहे. पारंपरिक पद्धतीत काही बदल करून नवे पायंडे पाडले जात आहेत. आडिवरे गावातील कोंडसर खुर्द येथील वैभव वारीशे यांनी वडिलांचे श्राद्ध फोटो पूजनाने केले तसेच गुढीपाडवाही पताका ध्वज उभारून केला होता. या घटनांची बरीच चर्चा सुरू असतानाच आता कोंडसर बुद्रुक येथील संतोष दावडे यांनी गृहप्रवेशाचा नवा पायंडा पाडला आहे. परिवर्तनाच्या या घटनांची जोरदार चर्चा सुरू असून अनेकांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
घर घेत आहात, कर्ज मिळत नाही, मग येथे भेट द्या
नवीन घर घेतानाच अनेकांच्या नाकीनऊ येत असतात. मुंबई, विरारसारख्या ठिकाणी घर घेताना अनेक तडजोडी कराव्या लागतात. त्यातच पारंपरिक पद्धतीने गृहप्रवेश करायचा असेल तर अनेक विधीही कराव्या लागतात. या सर्व गोष्टी करताना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कुणबी समाजातील काही तरुण वेगळ्या वाटा अनुसरायला लागले असून त्यांच्या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
सर्व प्रकारच्या कर्जांसाठी अवश्य भेट द्या
संतोष दावडे हे मूळचे आडिवरे, कोंडसर बुद्रुक येथील रहिवासी आहेत. त्यांनी प्रचंड मेहनती घेऊन त्यांच्या व्यवसायातून आर्थिक उन्नती साधली आहे. त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही ते कार्यरत आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी अनेकांना धान्यवाटप केले होते. गरिबी काय असते याची जाणीव असलेल्या संतोष दावडे यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे.
फुकट का खेळता, खेळता खेळता पैसे कमवा
संतोष दावडे यांनी विरारमध्ये घर घेतले. यावेळी त्यांनी गृहप्रवेश करताना पारंपरिक पद्धतीला फाटा दिला. गृहप्रवेश आणि गणेशपूजन त्यांनी स्वत: केले. त्यांच्या या निर्णयाने नवा पायंडा पडला आहे. संतोष दावडे आणि वैभव वारीशे यांनी घेतलेल्या परिवर्तनाच्या निर्णयाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
0 Comments