Header Ads Widget

स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेऊन विद्यार्थ्यांनी विचारांचे पैलू पाडावेत - नंदकुमार मोहिते


स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेऊन विद्यार्थ्यांनी विचारांचे पैलू पाडावेत - नंदकुमार मोहिते

रत्नागिरी - श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी पेजे कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, श्रमिक विद्यालय व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग अंतर्गत ७८व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात विद्यार्थ्यांना उद्बोधित करताना स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना पैलू पाडावेत. संविधान समजून घ्यावे, त्याप्रमाणे आचरण करावे, आपल्या हक्कांचा, अधिकारांचा डोळस विचार करावा आणि सामाजिक भान ठेवून राष्ट्रीय कर्तव्याला जागावे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श नजरेसमोर ठेवावा, असे मौलिक विचार श्रमिक किसान सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार मोहिते यांनी व्यक्त केले. या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात १९ विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा इतिहास आणि अभिमान मनोगतातून व्यक्त केला. या कार्यक्रमांमध्ये 'ए मेरे वतन के लोगो' या गीतातून स्वातंत्र्याच्या रक्षणार्थ सीमेवर लढणाऱ्या शूरवीरांना मानवंदना दिली. तसेच ५७वा युथ फेस्टिवलमध्ये २०२४ या मुंबई विद्यापीठ स्तरावर तृतीय क्रमांकाची विजेती झालेली "बहुरंगी" या एकांकिकेतील कलाकार विद्यार्थी, मार्गदर्शक प्राध्यापक ओंकार लिंगायत तसेच मुंबई विद्यापीठाच्या १६८व्या वर्धापन दिनानिमित्त महाविद्यालयीन विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थी तसेच राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. 

या कार्यक्रमात वरिष्ठ महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रमोद वारीक यांनी १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन का मानला जातो, याचा इतिहास मनोगतातून व्यक्त केला. या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने बक्षीस वितरण सोहळ्यात संस्थेचे सहसचिव अविनाश डोर्लेकर, अभिमन्यू मयेकर, खजिनदार प्राध्यापक राकेश आंबेकर, श्रमिक विद्यालय व लोकनेते शामरावजी पेजे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकर थुळ, सुलभा बोले, प्राध्यापक शालिनी चांदले, सर्व प्राध्यापकवृंद, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी श्रावणी कुळ्ये, प्रास्ताविक विद्या येमूळ आणि आभार संचिता हिने मानले. सर्वांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

जाहिरात - अभिज्ञान अकादमी


Post a Comment

0 Comments