Header Ads Widget

लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयात ७८ वा स्वातंत्र्यदिन दिमाखात संपन्न


लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयात  ७८ वा स्वातंत्र्यदिन दिमाखात संपन्न 

रत्नागिरी - श्रमिक किसान सेवा समिती संचलित लोकनेते शामरावजी पेजे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिवार आंबेरे, रत्नागिरी, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल व श्रमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक विभागांतर्गत ७८ वा स्वातंत्र्यदिन दिमाखात संपन्न झाला. या मंगलमय स्वातंत्र्याचा ध्वज दिमाखात फडकवण्याचा सन्मान श्रमिक किसान सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार मोहिते यांना लाभला. त्यांच्या हस्ते स्वातंत्र्याचा ध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजाला सलाम, संविधान तसेच समूहगीताने या कार्यक्रमाला रंगत आणली. स्वातंत्र्याच्या घोषणांनी विद्यानगरी दुमदुमली. 

या सोहळ्यामध्ये शिवार आंबेरेचे सरपंच राजन रोकडे, उपसरपंच नंदकुमार मोर्ये, अर्जुन कदम, सुलभा बोले, गोपाळ रोकडे, सुनील रोकडे, विश्वनाथ खानविलकर, सहदेव गुरव, संजीवनी शिर्सेकर, काशिनाथ खानविलकर, सखाराम आंब्रे , सुरेश लाखण, ग्रामपंचायत शिवार आंबेरे सदस्या मनीषा चव्हाण, रवींद्र लाखण, जितेंद्र शिर्सेकर, दिवाकर कदम, संजय पेजे, वैभव बावकर, श्रमिक विद्यालय व लोकनेते शामरावजी पेजे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकर थुळ, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रमोद वारीक, श्रमिक किसान सेवा समितीचे खजिनदार राकेश आंबेकर, सहसचिव अविनाश डोर्लेकर, शालिनी चांदले, ग्रामस्थ, पालक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने हा मंगलमय सोहळा संपन्न झाला.


जाहिरात  - अभिज्ञान अकादमी



Post a Comment

0 Comments