Header Ads Widget

लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयात ध्वजारोहन

रत्नागिरी -  श्रमिक किसान सेवा समिती संचालित, लोकनेते शामरावजी पेजे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, शिवार आंबेरे येथे १४ ऑगस्ट २०२४ रोजी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये बहुसंख्य विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. या ध्वजारोहण कार्यक्रमांमध्ये ध्वज फडकवण्याचा सन्मान महाविद्यालयातील कर्मचारी गोवर्धन मोहिते यांना देऊन त्यांच्या शुभहस्ते ध्वज फडकविण्यात आला. 

या कार्यक्रमाला श्रमिक विद्यालय लोकनेते शामरावजी पेजे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकर थुळ, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रमोद वारीक, श्रमिक किसान सेवा समितीचे खजिनदार प्राध्यापक  राकेश आंबेकर, सहसचिव अविनाश डोर्लेकर त्याचप्रमाणे प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments