shinde vs Thackeray : देवाचे गोठणेत ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार
किरण सामंतांवर विश्वास, दीपक नागलेंचे प्रयास
विशेष प्रतिनिधी
राजापूर - देवाचे गोठणे पंचायत समिती गणात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडले आहे. किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत देवाचे गोठणे पंचायत समिती गणातील प्रमुख पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो ग्रामस्थांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक नागले यांनी विशेष प्रयत्न केले.
सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे पंचायत समिती गणातील ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकारी, पंचायत सदस्य, माजी ग्रामपंचायत सरपंच, माजी ग्रामपंचायत सरपंच, शेकडो ग्रामस्थांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. राजापूर तालुका प्रमुख दीपक नागले यांच्या विशेष प्रयत्नाने या सर्व ग्रामस्थांनी रत्नागिरी येथे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
यामध्ये देवाचे गोठणेमधील विनोद शेलार, निलेश नवाळे, विवेक नवाळे, लक्ष्मण नवाळे, आनंद तिर्लोटकर, विकास नाटेकर, रवी राघव, नरेंद्र मेस्त्री, राजेश मेस्त्री, नितीन जाधव, बिपिन लाखण, राजाराम गुरव, अनिल गुरव, निखिल जाधव, प्रभाकर ठुकरुल, शांताराम राऊत, भिकाजी पवार, विशाल राऊत, श्रीकांत ठुकरुल, साहिल राऊत, सुनील गिजम, मनोज नवाळे, संस्कार गोर्ले, आर्यन नवाळे, राजेंद्र भारती, रामदास चव्हाण, केरू परवडी, राजू गार्डी, कमलाकर आईर, यशवंत सोडये तसेच धाऊलवल्ली गावातील कमलेश आंबेलकर, राहुल आंबेलकर, जयेश बाणे, शैलेश दळवी, संजय भाटले, रसिका शिवगण, दीक्षा जोशी, ललिता वेल्ये, मनीषा सोड्ये, तुकाराम पारकर आदींनी ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवबंधन तोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी किरण सामंत यांच्या उपस्थितीत देवाचे गोठणे पंचायत समिती गणासाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये देवाचे गोठणे पंचायत समिती गण विभागप्रमुख म्हणून विनोद शेलार, उपविभाग प्रमुख प्रभाकर ठुकरुल, युवा सेना उपविभागप्रमुख सुनील गिजम, महिला उपविभाग प्रमुख म्हणून रसिका शिवगण, धाऊलवल्ली शाखाप्रमुख राहुल आंबेलकर, शैलेश दळवी, बूथप्रमुख जयेश बाणे, संजय भाटले, महिला शाखाप्रमुख दीक्षा जोशी, देवाचे गोठणे शाखाप्रमुख निलेश नवाळे, केरू परवडी, राजू भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

0 Comments