Header Ads Widget

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती संपन्न


साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची  १०४ वी जयंती संपन्न

आडिवरे - मराठी भाषेला जागतिक पातळीवर नेणारे आणि मराठी साहित्याच्या ज्ञान चळवळीतील सुवर्णाक्षरांनी लिहिलेले नाव म्हणजेच अण्णाभाऊ साठे. अशा या थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची आज १०४ वी जयंती लोकनेते शामरावजी पेजे कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय, श्रमिक विद्यालय आणि सावित्रीमाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल शिवार आंबेरे, रत्नागिरी येथे साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांना साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक कार्याचे ज्ञान व्हावे आणि विद्यार्थ्यांसमोर अशी थोर विभूती आदर्श स्वरुपात उभी राहावी या उद्देशाने हा जयंती सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो.

यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. कुमारी तनुजा मेस्त्री बारावी विज्ञान हिचे मनोगत उल्लेखनीय ठरले. प्रा. अमित पवार आणि प्रा. राकेश आंबेकर यांनी मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली. त्याचप्रमाणे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रमोद वारीक यांनी आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे व श्रमिक विद्यालयाचे प्राचार्य मधुकर थुळ यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. 

या जयंती सोहळ्यावेळी प्रा. समृद्धी कूड यांनी सूत्रसंचालन तर प्रा. शालिनी चांदले यांनी प्रास्ताविक केले. तर प्रा. अर्चना यांनी आभार मानले.

जाहिरात - अभिज्ञान अकादमी


Post a Comment

0 Comments