dhaulvalli gokhale school : उत्साह शिक्षण सप्ताह २०२४चा
- संदीप शेमणकर
आडिवरे - धाऊलवल्ली येथील कै. सौ. आनंदीबाई कृष्णाजी गोखले माध्यमिक विद्यालयात शिक्षण सप्ताह २०२४ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. या शाळेतून यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी व्यवसाय सुरू करून गावाची प्रगती करत आहेत.
या शिक्षण सप्ताहात शिक्षकांनीही पुढाकार घेतला. अध्ययन - अध्यापन साहित्य निर्मितीचे कामकाज हळदणकर आणि महाले यांनी पाहिले. संख्याज्ञान गणित विभागाचे काम कोकरे यांनी पाहिले. तर क्रीडा विभागाची जबाबदारी कुंभार यांनी सांभाळली. सांस्कृतिक दिवस, पोषण आहार आणि इको क्लब उपक्रम यांचे कामकाज हळदणकर आणि कार्शिंगकर यांनी पाहिले. त्याचबरोबर तंत्रज्ञान दिवसाची धुरा पोकळे आणि आंबेलकर यांनी सांभाळली. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि कलागुणांचा विकास होण्यास खूपच मदत झाली. मुख्याध्यापिका हरचकर यांनी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांचे कौतुक केले.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
0 Comments