ताणतणाव विसरा आणि मस्त जगा
आडिवरे - श्रमिक विद्यालय व लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयामध्ये ताण-तणाव व्यवस्थापन मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी अंतर्गत ताणतणाव व्यवस्थापन मार्गदर्शनाचा कार्यक्रम श्रमिक विद्यालय व लोकनेते शामरावजी कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय शिवार आंबेरे, रत्नागिरी येथे १ ऑगस्टला आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयांमधून डॉ. प्रमोद शाक्य, जीवन तांदळे, प्रवीण भोयर उपस्थित होते. श्रमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर थुळ यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टरांचे स्वागत केले. इयत्ता दहावी, बारावी आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा आणि अभ्यासाचा येणारा ताण-तणाव दूर करण्यासाठी विविध गोष्टींच्या माध्यमातून उपाय सुचवले. त्याचप्रमाणे जीवन तांदळे आणि प्रवीण भोयर यांनी मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्य सक्षम बनवण्यासाठी विविध सोप्या पायऱ्या सुचवल्या. विद्यार्थ्यांजवळ मुक्त संवाद साधत तणावमुक्ततेचा यशस्वी प्रयत्न केला. यावेळी श्रमिक विद्यालय, लोकनेते शामरावजी पेजे कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
0 Comments