Header Ads Widget

virar jivdani : जीवदानीच्या डोंगरावर वृक्षारोपण


virar jivdani : जीवदानीच्या डोंगरावर वृक्षारोपण

कुणबी बांधवांचा पुढाकार,  निसर्गप्रेंमीची साथ

रविवार दिनांक २८ जुलै २०२४ विरारमधील कुणबी बांधवांनी निसर्गप्रेमींच्या मदतीने श्री जीवदानी देवी डोंगरावर वृक्षारोपण उत्सव १०० साजरा केला. ५०० काजूची रोपे आणि वीस किलो काजूच्या बियांची लागवड केली. या वृक्षारोपणसाठी वसई विरार कुणबी अस्मिता संस्थेचे अध्यक्ष तुकाराम पष्टे यांनी पुढाकार घेतला. विरारमधील कुणबी बांधव आणि निसर्गप्रेमींना एकत्र येऊन हा कार्यक्रम दरवर्षी राबविला जातो. या वृक्षारोपणसाठी श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्टने खड्डे खोदून ठेवल्याने वृक्षारोपण करणे खूपच सहज पार पडले. यासाठी नितीन पाटील यांचे सहकार्य दरवर्षी लाभत असते.








Post a Comment

0 Comments