school news : शाळेची संरक्षक भिंत कोसळली, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष
कडवई साळवीवाडी शाळेतील संरक्षण भिंत कोसळूनही बांधण्यास मुहूर्त मिळेना
ग्रामस्थांनी पाठपुरावा करूनही शिक्षण विभागाचे दुर्लक्ष
- सारिका माळी
संगमेश्वर - संगमेश्वर तालुक्यातील कडवई साळवीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंत कोसळून एक वर्ष झाले तरी संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही भिंत सदर शाळेच्या इमारतीपासून तीन ते चार फुटांवर आहे. वेळेत भिंतीचे काम न केल्यास इमारतीला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अतिवृष्टीमुळे २५जुलै २०२३ रोजी शाळेची भिंत कोसळली. यावेळी ग्रामस्थांनी पाठपुरावा करीत सदरचे काम तातडीने म.रां.रो.ह. योजनेमध्ये घेण्याची विनंती केली होती तसेच तालुकास्तरीय रोजगार हमी योजनेमध्ये त्याला मंजुरी मिळावी अर्ज दिला होता, मात्र गटशिक्षण अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे काम रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित विभाग विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळत असून जर पाठपुरावा केला नाही तर १५ ऑगस्ट रोजी पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा कडवई ग्रामपंचायतचे माजी सरपंच वसंत उजगावकर यांनी दिला आहे.
शाळेच्या कंपाऊंड वॉलसंदर्भात आयुक्त कार्यालयातून सक्त आदेश आहेत. तरीही आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
0 Comments