Header Ads Widget

school news : शाळा डिजिटल करण्याचा संकल्प, माझी शाळा - माजी विद्यार्थी ग्रुपचा पुढाकार


school news : शाळा डिजिटल करण्याचा संकल्प,
माझी शाळा - माजी विद्यार्थी ग्रुपचा पुढाकार

- संदीप शेमणकर

राजापूर -   राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कोळंब शाळेला माझी शाळा - माजी विद्यार्थी ग्रुप यांच्या सौजन्याने शैक्षणिक सुविधा प्रदान कार्यक्रमात संगणक संच आणि प्रिंटर भेट देण्यात आला. सरपंच शाहू पाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला माझी शाळा - माजी विद्यार्थी ग्रुपचे सीताराम मोरे, महेंद्र पाटेकर, अनंत भोवड, काशिनाथ पाटेकर, महेंद्र भोवड, मनोहर सावंत तसेच उपसरपंच योगेश सुतार, सदस्य सहदेव सुतार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यवान पाटेकर, पोलीस पाटील प्रभाकर पाटेकर, हरिश्चंद्र पाटेकर, संजय  पाटेकर, शिक्षणप्रेमी शशिकांत शिंदे, नारायण पाटेकर, रामजी पाटेकर, वैभवशाली कोंकण युट्युब चॅनलचे बाळा पाटेकर, सहदेव सुतार, शिक्षक प्रसाद काकिर्डे, विजयकुमार माने, प्रणाली मोरे आदींची प्रमुख उपस्थिती लाभली. 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक जयेश तेलंग यांनी वर्षभरातील शाळेच्या कार्याचा आढावा दिला आणि डिजिटल स्कूलची आवश्यकता सांगितली. ग्रुपचे महेंद्र पाटेकर यांनी मार्गदर्शन करताना शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुण हेरून त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करत असलेले पाहून आनंद होत असल्याचे आणि गावातील प्रत्येक विद्यार्थ्याला २१ व्या शतकात टिकण्यासाठी आवश्यक ते ज्ञान, तंत्रज्ञान मिळण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही माजी विद्यार्थी सदैव तयार असू, असे माझी शाळा - माजी विद्यार्थी ग्रुपच्या वतीने अभिवचन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद काकिर्डे तर आभार प्रदर्शन विजयकुमार माने यांनी केले. शाळेला शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी अनिल पाटेकर, अनिल चव्हाण, तन्वी पाटेकर, सहदेव पाटेकर, तारामती पाटेकर, दयानंद पाटेकर, मिहिर मोरे, प्रकाश चंदूरकर, अशोक पाटेकर, चंद्रकांत पाटेकर, विलास कांबळे, रमेश पाटेकर, अंजली माने, अमित पाटेकर, गणेश पाटेकर, शांताराम माने, प्रभाकर भोवड, निधी पाटेकर, साक्षी पाटेकर, अनिल  पाटेकर, दिनेश पाटेकर, महेश पवार, पुरुषोत्तम पाटेकर, चंद्रकांत पाटेकर, भालचंद्र पाटेकर, तुकाराम पाटेकर, रोहित पाटेकर, सर्वेश माने, मधुकर कदम, तुषार पाटेकर, संदीप पवार, अनंत भोवड, दत्ताराम  कदम, महेंद्र मोरे, विलास  पाटेकर, हरीश पाटेकर, भागोजी पाटेकर, प्रमोद पाटेकर, अशोक भोवड, अनंत माने, किरण शिंदे, प्रकाश  पाटेकर, श्रीकृष्ण पाटेकर ,रुपेश मोरे, सत्यवान पाटेकर, बाबुराव पाटेकर, सुभाष पाटेकर, वेद पाटेकर, राज मोरे, मनोहर  सावंत, अमित पवार, प्रशांत मोरे, मंगेश पवार, संतोष पाटेकर, मंगेश राणे, समीर पाटेकर, प्रकाश पाटेकर, गोपीनाथ पाटेकर, प्रवीण शेरे, सुरेंद्र पाटेकर, नरेश शिवगण, विलास पाटेकर, गुणाजी पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमाबद्दल परिसरातून माजी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

जाहिरात - अभिज्ञान अकादमी



Post a Comment

0 Comments