STUDY TIPS : स्टडी टिप्स - एक शैक्षणिक उपक्रम
नावेरी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचा पुढाकार
- सारिका माळी
लांजा - लांजा तालुक्यातील कोंडगे येथे शनिवार दिनांक २७ जून २०२४ रोजी नावेरी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ (मुंबई) संचालित श्री रामेश्वर विद्यालय कोंडगे येथे संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक मार्गदर्शन म्हणून स्टडी टिप्स हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात मुलांसाठी शैक्षणिक भीती, परीक्षेची तयारी कशी करावी, टोपर्सचे सिक्रेट, आवड कशी निर्माण करावी, वाचण्याच्या पद्धती, मानसिकता, मोटिव्हेशन अशा अनेक विषयांचे मार्गदर्शन कोकणातील कोकण उद्योगरत्न पुरस्कार सन्मानित संदीप गोबरे यांनी केले.
![]() |
| जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
श्री रामेश्वर विद्यालय कोंडगेच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक दर्जेदार श्रेणी वाढवावी, मुलांना नवीन संकल्पना शिकता यावी, मुलांचे उद्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे, ही संकल्पना घेऊन या संस्थेने हे पाऊल उचलले आहे.
![]() |
| जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
'खरंच सांगावसं वाटतं' या संस्थेचे संस्थापक सीईओ एकनाथ विश्वासराव यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले जात आहे. या संस्थेने मुलांच्या हिताचे निर्णय घेऊन शैक्षणिक क्षेत्रात वेगळा ठसा निर्माण केला. माध्यमिक शिक्षण विभागात काम करणाऱ्या संस्थांना एकनाथ विश्वासराव यांच्यासारखे सीईओ मिळाले तर ग्रामीण भागातील शाळा दर्जेदार चालतील आणि विद्यार्थी घडतील, असेही विचार यावेळी मांडण्यात आले.
![]() |
| जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
या कार्यक्रमावेळी संस्थेचे कार्यकारी मंडळ, स्थानिक कार्यकारी मंडळ, पालकवर्ग, ग्रामस्थ, सभासद तसेच शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकवर्ग उपस्थित होते.




0 Comments