गुणवंत व्हा, कीर्तिवंत व्हा ! - प्रकाश पवार
मराठा समाजसेवा संघ, राजापूरच्या वतीने गुणगौरव समारंभ
- संदीप शेमणकर
राजापूर - आज तुम्ही यशवंत झाला आहात आता अधिक मेहनत करून गुणवंत व्हा, मग नकीच तुम्ही पुढच्या आयुष्यात कीर्तिवंत व्हाल, असा संदेश मराठा समाजसेवा संघ राजापूरचे अध्यक्ष प्रकाश पवार यानी मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमावेळी दिला.
राजापूर हायस्कूलच्या कलामंदिर सभागृहात नुकताच मराठा समाज सेवा संघाच्या वतीने मराठा समाजातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत यशस्वी विद्यार्थांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष आणि मराठा समाजसेवा संघाचे ज्येष्ठ सदस्य जगदीश पवार, विधीतज्ज्ञ ॲड. राहुल राणे, ॲड. गुरुदत्त खानविलकर, राजापूर पंचायत समितीचे माजी सदस्य एकनाथ लाड, भाइ गुणीजन, मराठा समाजसेवा संघाच्या उपाधक्षा हर्षदा खानविलकर, प्राची शिर्के, धोपेश्वर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच ओगले आणि मराठा समाजसेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
![]() |
| जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
यावेळी राजापूर तालुक्यात मराठा समाजातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मराठा समाजसेवा संघाच्या वतीने प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला. मराठा समाजातून तालुक्यात इयत्ता दहावी मराठा माध्यम, इंग्रजी माध्यम तसेच इयत्ता बारावीमधून कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
![]() |
| जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
या कार्यक्रमावेळी मार्गदर्शन करताना राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष आणि मराठा समाजसेवा संघाचे ज्येष्ठ सदस्य जगदीश पवार यांनी 'जो माणूस काहीच करत नाही त्याची जगाला कधीच गरज नसते, मात्र जो सतत काहीतरी करत असतो त्याची जगाला सातत्याने गरज असते. त्यामुळे आयुष्यात काहीतरी करत राहा, मग तुम्ही जगाच्या गरजेचे असाल', असे सांगितले. भविष्यात आपल्यातील कलागुण ओळखून आणि आपली आवड जपत पुढील क्षेत्र विद्यार्थ्यानी निवडले पाहिजे, असेही त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमावेळी मराठा समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सदस्य प्रकाश सावंत, उमेश दळवी, अरुण नलावडे, विलास शिंदे आणि मराठा बांधव उपस्थित होते.
![]() |
| जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
या कार्यक्रमादरम्यान मराठा समाजसेवा संघाला भरीव आर्थिक योगदान देणारे राजापूर शहरातील डॉक्टर सागर पाटील, जगदीश पवार, जितेंद्र खामकर, भालचंद्र पवार, नंदकुमार पवार, एकनाथ चव्हाण, ठेकेदार संघटनेचे नरेश दसवंत, सेवानिवृत्त शिक्षिका प्रणोती भोसले आदी मान्यवरांचा मराठा समाजसेवा संघाच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
![]() |
| जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
या गुणगौरव कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठा समाजसेवा संघाचे सदस्य पत्रकार राजन लाड यांनी केले तर मराठा समाजसेवा संघ राजापूरचे सचिव पत्रकार विनोद पवार यांनी आभार मानले.
.png)




0 Comments