भव्य मॅरेथॉन, लांजेकर धावले
लांजा - स्वराज्य मित्र मंडळ भगते वाडी (इंदवटी-लांजा) रत्नागिरी भव्य मॅरेथॉन स्पर्धा २०२४ आयोजित करण्यात आली होती. 12 मे रोजी निओशो ते इंदवटीदरम्यान लांजा राजापूर तालुक्यातील गाव अंतर्गत मर्यादित भव्य मॅरेथॉन स्पर्धा २०२४ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ६५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ५६ स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
मॅरेथॉन स्पर्धा २०२४ विजेते:-
अ गट मुले विजेता (वय १३ ते१५ वर्ष)
१) तन्मय गावडे, गाव - माजल लांजा (प्रथम क्रमांक)
२) अथर्व माजळकर, गाव - झापडे लांजा (द्वितीय क्रमांक)
३) मनीष पालये, गाव - कोड्ये लांजा (तृतीय क्रमांक)
अ गट मुली विजेत्या (वय १३ ते १५ वर्ष)
१) सौरभी गुरव, गाव - वनगुले लांजा (प्रथम क्रमांक)
२) स्वरा उपशेटे, लांजा (द्वितीय क्रमांक)
ब गट मुले विजेता (वय १६ ते १९ वर्ष)
१) महेंद्र कुडकर, गाव - शिरवली लांजा (प्रथम क्रमांक)
२) शुभम मांडवकर, गाव - पेंडखले राजापूर (द्वितीय क्रमांक)
३) सोहम कांबळे, गाव -चुनाकोळवन राजापूर (तृतीय क्रमांक)
ब गट मुली विजेत्या (वय १६ ते १९ वर्ष)
१) श्रुती पळसमकर, गाव - भू राजापूर (प्रथम क्रमांक)
क गट मुले विजेता ( वय २० ते ५० वर्ष)
१) नीलेश कुळये, गाव - वेरवली लांजा (प्रथम क्रमांक)
२) संकेत मसने, गाव - पन्हेल लांजा (द्वितीय क्रमांक)
३) संकेत पाजवे, गाव - दसुर लांजा (तृतीय क्रमांक)
क गट मुली विजेत्या ( वय २० ते ५० वर्ष)
१) शमिका मणचेकर, गाव - देवधे लांजा (प्रथम क्रमांक)
२) संजना घडशी, गाव - इंदवटी लांजा (द्वितीय क्रमांक)
या स्पर्धेसाठी श्रीधर पाटील आणि नीलेश बागडी यांनी पंचाची भूमिका पार पाडली तसेच सरपंच गुरव, नामदेव कानडे, अनोज जाधव, शैलेश जाधव, तांबे, जाधव आरोग्य सेविका यांनी आपापली जबाबदारी पार पाडली. त्याचबरोबर आर्थिक मदत आणि चषकासाठी अनेकांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानण्यात आले. शांताराम कानडे, उमाकांत पालकर, संजय भगते यांचे विशेष आभार मानण्यात आले.
नेतृत्व गुण अनेकांमध्ये असतात फक्त ते हेरून त्यासाठी संधी मिळणे आणि मिळालेल्या संधीतून अस्तित्व निर्माण करणे हे प्रत्येकाला जमलं पाहिजे. यासाठी स्वराज्य मित्रमंडळ संघटना असून ही एक मार्गदर्शक चळवळ आहे. आपल्या माणसांनी एकत्र येत आपल्यालासाठी बनविलेले संघटन आहे. अशा उपक्रमाच्या आयोजनांतून अनेकांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळून विविध संधी तयार होते. मात्र संधी म्हणजे मॅरेथॉन खेळ नसून त्यानिमित्ताने उत्तम वक्ता (समालोचक), गुणलेखक, पंच समीक्षक बनू शकतो. या स्पर्धांबरोबरच शैक्षणिक शिबीर, आरोग्य शिबीर, सांस्कृतिक कलाविष्कार, रक्तदान, सहल असे विविध उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविले जात आहेत. त्याचे फायदेही समाजातील तरुणांना होत आहेत.
0 Comments