Header Ads Widget

'त्या' साकवावरून कुणाच्या पडायची वाट पाहिली जातेय का?


'त्या' साकवावरून कुणाच्या पडायची वाट पाहिली जातेय का?

कुडवली बौद्धवाडीतील साकव मोजतोय अखेरची घटका

 - संदीप शेमणकर

देवरुख - संगमेश्वर तालुक्यातील कुडवली बौद्धवाडी येथील लोखंडी साकवाची दुरवस्था झाली आहे. मुसळधार पावसात हा साकव वाहून जाण्याची भीतीदेखील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. कुडवली बौद्धवाडी येथील सप्तलिंगी नदीवरील लोखंडी साकव पुढे साडवली एमआयडीसी आणि कोसुंब या दोन ठिकाणी जोडतो. सध्या साकव अत्यंत धोकादायक बनला आहे. ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना या साकवावरून प्रवास करणे थांबवले आहे. मात्र सध्या येथील विद्यार्थी कुडवली ते देवरुख आणि त्यानंतर देवरुख ते कोसुंब असा एसटी प्रवासाचा दूरचा वळसा मारून कोसुंब हायस्कूल जात आहेत. दुसरा जवळचा मार्गच नसल्याने येथील विद्यार्थ्यांना हा पर्याय निवडवा लागला आहे. 

जरा हटके

या साकवाची विद्यार्थी आणि ग्रामस्थांसाठी असणारी गरज ओळखून संबंधित यंत्रणेसह लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

Post a Comment

0 Comments