Header Ads Widget

anil parab : मायेची सावली...परबांचा सत्कार


अनिल परब यांचा सत्कार

 मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेचा पुढाकार

- संदीप शेमणकर

मुंबई -  मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिवसेना अनिल परब हे विजयी झाल्याबद्दल त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेप्रणित 'मायेची सावली एक हात कर्तव्या'चा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल खोपकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव संदीप चादिवडे, संचालक दौलत बेल्हेकर, विश्वनाथ जाधव, वसंत घडशी आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख नेत्यांपैकी एक महत्त्वाचे नेते आणि राज्याचे माजी परिवहनमंत्री अशी अनिल परब यांची राजकीय ओळख आहे. ते ठाकरे कुटुंबीयांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी एक आहेत. मागील २० वर्षांपासून ते शिवसेनेत कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांना तीनदा विधान परिषदेवर पाठवले आहे. शिवसेनेचे संकटमोचक म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. याशिवाय मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची असते.


जाहिरात - अभिज्ञान अकादमी


Post a Comment

0 Comments