SBI SCO Recruitment 2024: एसबीआय SCO भरती ! कसा कराल अर्ज, कशी होणार निवड?
SBI SCO Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी उमेदवारांना एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. एक उमेदवार फक्त एकाच पदासाठी अर्ज करू शकतो, त्याला अनेक पदांसाठी अर्ज करता येणार नाही. तर या भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे व पदसंख्या, अर्ज कसा करायचा, शैक्षणिक पात्रता याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या…
SBI SCO Recruitment 2024: रिक्त पदे व पदसंख्या :
सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड): २ पदे
सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट): २ पदे
प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (टेक्नॉलॉजी): १ पद
प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (व्यवसाय): २ पदे
रिलेशनशिप मॅनेजर: २७३ पदे
व्हीपी वेल्थ (VP Wealth) : ६४३ पदे
रिलेशनशिप मॅनेजर – टीम लीड: ३२ पदे
प्रादेशिक प्रमुख: ६ पदे
गुंतवणूक विशेषज्ज्ञ: ३० पदे
गुंतवणूक अधिकारी: ३९ पदे
अशाप्रकारे एकूण या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील १०४० रिक्त पदे भरली जाणार आहेत.
SBI SCO Recruitment 2024: शैक्षणिक पात्रता, पगार
प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता, पगार अधिसूचनेत नमूद केला आहे, तो एकदा तपासून घ्यावा.
अधिसूचना लिंक : https://sbi.co.in/documents/77530/43947057/180724-ADV_CRPD_SCO_2024_25_09.pdf/7b68375a-8f15-7c0f-3a0b-3d719d6afded?t=1721318431793
SBI SCO Recruitment 2024: अर्ज फी –
अर्ज शुल्क (नॉन-रिफंडेबल) सामान्य/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ७५० रुपये आहे आणि एससी / एसटी /ओबीसी / पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही. स्क्रीनवर विचारल्याप्रमाणे माहिती देऊन डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग इत्यादी वापरून पेमेंट ऑनलाईन केले जाऊ शकते.
SBI SCO Recruitment 2024: इतर माहिती :
उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे (बायोडाटा, आयडी पुरावा, वयाचा पुरावा, जात प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता, अनुभव) अपलोड करणे आवश्यक आहे, असे न केल्यास त्यांचा अर्ज / उमेदवारी शॉर्टलिस्टिंग / मुलाखतीसाठी विचारात घेतली जाणार नाही. अधिक संबंधित तपशिलांसाठी उमेदवार SBI ची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.
लिंक : sbi.co.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
१९ जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना ८ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
SBI SCO Recruitment 2024: उमेदवाराची निवड कशी होईल ?
निवड शॉर्टलिस्टिंग व मुलाखत-सह-सीटीसीवर आधारित असेल. मुलाखतीला १०० गुण असतील. मुलाखतीतील पात्रता बँकेद्वारे ठरवले जातील. निवडीसाठी गुणवत्ता यादी केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उतरत्या क्रमाने तयार केली जाईल. एकापेक्षा जास्त उमेदवारांनी कट-ऑफ गुण (कट-ऑफ पॉइंटवर सामान्य गुण) मिळविल्यास, अशा उमेदवारांना त्यांच्या वयानुसार, गुणवत्तेनुसार रँक केले जाईल. source - www.loksatta.com
0 Comments