'मायेची सावली एक हात कर्तव्या'चा संस्थेतर्फे वारकरी मंडळींचा सत्कार
- संदीप शेमणकर
मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेप्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंगळवारी अमृतनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, विक्रोळी पार्क येथून प्रतिपंढरपूर श्री विठ्ठल रखुमाई मंदिर वडाळा येथे दिंडी दर्शन सोहळा पार पडला. यावेळी संजय भालेराव यांच्या हस्ते वारकरी यांना फळं देण्यात आली. या वेळी मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष यशवंत वि. खोपकर, दौलत बेल्हेकर, श्रीकांत चिचपुरे, राजेंद्र पेडणेकर, विजय शिरोडकर तसेच ॐअधिनाथ पखवाज विद्यालय ह.भ.प. बाळकृष्ण शिंदे महाराज, ऋषिकेश शिंदे, भावेश शिंदे, नामदेव कळंबे, दीपक फाळके, संजय गोगावले, विलास सणस, देवचंद कदम, शरद कदम, गणेश कदम, त्यांचे सहकारी तसेच विभागातील वारकरी संप्रदायातील वारकरी मंडळी उपस्थित होते.
0 Comments