kunbi samaj konkan : तिल्लोरी कुणबी प्रश्न मार्गी लागणार - नंदकुमार मोहिते
प्रतिनिधी
मुंबई - कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य आणि बळीराज सेना यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी १ जुलै २०२४ रोजी रात्री ८ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी कोकणातील कुणबी समाज्याच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सभा आयोजित करण्यात आली होती.
कोकणातील कुणबी समाजाला समस्या
1. तिल्लोरी कुणबी समाजाचा OBC च्या यादीत ८३ कुणबी या पोटाजातीत समावेश करण्यात यावा.
2. कोकणातील सर्व जिल्ह्यात घरठाण जमिनी, शेतजमिनी, देवस्थान इनाम जमिनी, वरकस जमिनी यामध्ये कसेल त्याची जमीन या तत्त्वनुसार बेदखल कुळ वहिवाटदारांना जमिनीचे मालकी हक्क मिळाले पाहिजेत.
3. कोकणातील प्रत्येक तालुक्यात लोकनेते शामराव पेजे कुणबी सांस्कृतिक भवन
4. लोकनेते शामरावजी पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळमधून व्यवसायिक शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी यांना पतपुरवठा करण्यासाठी जाचक अटी रद्द कराव्यात.
या सभेचे नेतृत्व कुणबी एकीकरण समिती, महाराष्ट्र व बळीराज सेनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित खात्याचे प्रधान सचिव तसेच कुणबी समाजोन्नती संघाचे प्रभारी अध्यक्ष सदानंद काष्टे, सरचिटणीस अरविंद डाफळे, सरचिटणीस नंदकुमार मोहिते, उपाध्यक्ष सुरेश भायजे, कृष्णाजी कोबनाक, बबन उंडरे, प्रकाश तरळ, कृष्णाजी वने, डॉ. प्रकाश बांगरत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
या सभेत तिल्लोरी कुणबी समाजाच्या प्रश्नासंबंधी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग, पुणे यांच्याशी तात्काळ संपर्क साधून तिल्लोरी कुणबी समाजाचा डेटा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जमा करण्यात यावा. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग, पुणे यांनी ठराविक मुदतीत शिफारसींसह राज्य शासनाकडे सुपूर्द करावा, अशा सूचना तात्काळ देण्यात आल्या. सभेत नंदकुमार मोहिते, अरविंद डाफळे, चंद्रकांत बावकर, सुरेश भायजे, संभाजी काजरेकर, हुंमणे गुरुजी, आगरे गुरुजी, रामचंद्र गराटे, शरदचंद्र गीते, वसंत आंबेलकर, तानाजी कुळये, गजानन धनावडे, संजय साळवी, शांताराम मालप, शांताराम खापरे, चांदिवडे, दीपक नागले, प्रकाश मांडवकर, राजेश बेंडल, अविनाश लाड, प्रदीप घडशी, सचिन गोवळकर, शरद शिवगण, प्रदीप उदेग, सुजित झिमण यासारखे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments