avinash lad : काँग्रेसची बैठक, लाडांची उपस्थिती
काँग्रेस पक्षाच्या दाभोळे जिल्हा परिषद गटाची आढावा बैठक
काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अविनाश लाड यांची प्रमुख उपस्थिती
- संदीप शेमणकर
लांजा - काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अविनाश लाड यांनी दाभोळे जिल्हा परिषद गटाची प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. या बैठकीला सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगतही व्यक्त केले. सर्वच पदाधिकाऱ्यांनी अविनाश लाड यांना आपले काम व जनसंपर्क या जोरावर आजपर्यंत कार्यकर्ता पक्षाशी एकनिष्ठ टिकून आहे. हेच तुमचे वैभव तुम्हाला विजयी करेल, असा विश्वास दिला. अविनाश लाड यांनी आपल्या भाषणात, तुम्ही सर्वांनी टाकलेला विश्वास मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने नक्कीच यशस्वी करेन, असे सांगितले. आपण सर्वांनी एक दिलाने काम कराल हीच अपेक्षा व्यक्त करतो, असेही अविनाश लाड यांनी सांगितले.
![]() |
| जाहिरात - अभिज्ञान अकादमी |


0 Comments