dhaulvalli gokhale school : शैक्षणिक कृतींमधे थीम ट्री ॲक्टीविटी
- संदीप शेमणकर
राजापूर - इको क्लब फॉर मिशन लाईफअंतर्गत थीम ट्री ॲक्टीविटीच्या माध्यमातून वृक्षारोपण, वृक्ष माझा मित्र या विषयांच्या अनुषंगाने चित्रकला आणि पोस्टर तयार करणे ही कृती कै. सौ. आनंदीबाई कृष्णाजी गोखले, माध्यमिक विद्यालय धाऊलवल्ली येथे राबविण्यात आली.
यामध्ये पर्यावरणासाठी वृक्षांचे महत्त्व पटवून देणारी चित्रे आणि पोस्टर तयार करून त्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्यामध्ये मोठा गट आणि छोटा गट असे प्रथम तीन नंबर काढण्यात आले.
मोठ्या गटात प्रथम क्रमांक कु. स्वानंद गणेश आयर, द्वितीय क्रमांक कु. साक्षी महेंद्र सोडये आणि तृतीय क्रमांक कु. प्रणव प्रित्येश राजापकर तर छोट्या गटात प्रथम क्रमांक कु. अपूर्वा विश्वनाथ बाणे, द्वितीय क्रमांक कु. आयर श्रद्धा गणेश, तृतीय क्रमांक - कु. अर्णव संदीप कांबळे यांनी मिळवला. परीक्षक म्हणून हळदणकर मॅडम यांनी उत्तम भूमिका पार पाडली.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
सदर कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिक हरचकर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि समस्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला घेतला. कार्यक्रमाचे निवेदन इयत्ता ६वीमधील कु. शेगुलकर एंजल किरण हिने केले.
0 Comments