Header Ads Widget

rajapur road : गेली नगर परिषद कुणीकडे ?


rajapur nagar parishad : गेली नगर परिषद कुणीकडे ?

राजापूर मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे, वाहनचालकांमध्ये तीव्र संताप

 - संदीप शेमणकर

राजापूर - राजापूर  शहरातील रिक्षा व्यावसायिकांनी जवाहर चौकात पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केल्यानंतरही राजापूर नगर परिषद प्रशासनाला जाग आलेली नाही. राजापुरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे अजून बुजवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे राजापूर नगर परिषद नेमकी करते काय, असा संतप्त सवाल राजापूरकरांनी उपस्थित केला आहे. 

राजापूर तालीमखाना ते जवाहर चौक या महत्त्वाच्या रस्त्याचे नूतनीकरण करून सहा महिनेदेखील झाले नाहीत. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर मोठे खड्डे असून शहरातील सुपर बाजारासमोर भला मोठा खड्डा पडला आहे. या संपूर्ण मार्गालाच स्वतंत्र गटार व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरूनच वाहते. त्यामुळे त्या पाण्यातून ये - जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. 

रस्त्यांवरील खड्डे भरले जात नसल्याने संतापलेल्या रिक्षा व्यावसायिकांनी जवाहर चौकातील एका खड्ड्यात वृक्षारोपण करून निषेध व्यक्त केला होता, मात्र एवढे होऊन नगर परिषद प्रशासनाने शहरातील या मुख्य मार्गावर पडलेले खड्डे भरले नाहीत. त्यामुळे नागरिकांमधून  तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित नगर परिषद प्रशासनाने  शहरात येणाऱ्या मुख्य मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 


Post a Comment

0 Comments