Header Ads Widget

तुकाराम लाखण यांची 'लाखमोलाची सेवा'


तुकाराम लाखण यांची 'लाखमोलाची सेवा'

श्रमिक विद्यालयाचे कनिष्ठ लिपिक तुकाराम लाखण यांचा सेवानिवृत्ती शुभेच्छा सोहळा

आडिवरे - जवळपास ३४ वर्षे श्रमिक शिवारे आंबेरे येथील विद्यालयात मनोभावे सेवा करणारे कनिष्ठ लिपिक तुकाराम लाखण सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या या सेवेचा सन्मान म्हणून सेवानिवृत्त शुभेच्छा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या शुभेच्छा सोहळ्यामुळे तुकाराम लाखणही भारावून गेले. 




श्रमिक विद्यालयाच्या स्थापनेपासून म्हणजेच १९९१ पासून  ३१ जुलै २०२४ पर्यंत म्हणजेच ३३ वर्ष ११ महिने १ दिवस कनिष्ठ लिपिक तुकाराम लाखण कार्यरत होते. या सेवानिवृत्त शुभेच्छा समारंभासाठी तुकाराम लाखण यांचे शिक्षकेतर कर्मचारी सहकारी केळकर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष पालवकर, त्याचबरोबर शिंदे, देवरुखकर, पाटील हे शिक्षक (विश्वेश्वर विद्यालय) आवर्जून उपस्थित होते. शिक्षण संकुलाच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन तुकाराम लाखण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केळकर यांनी मनोगत व्यक्त केले.  चळवळीतून उभ्या राहिलेल्या या शाळेमधला हा एक चळवळीतला नेता आज निवृत्त होत आहे, असे केळकर म्हणाले. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांनी 'सत्कारमूर्ती' तुकाराम लाखण यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

जाहिरात - अभिज्ञान अकादमी

शिक्षण संकुलाच्या वतीने आंबेकर, तरळ, डोर्लेकर, बांबाडे आणि मेस्त्री, भडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रमोद वारीक आणि श्रमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य थुळ यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षण संकुलाच्या वतीने लाखण यांच्या भावी आयुष्याच्या वाटचालीस आणि आरोग्यास सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. सेवानिवृती सोहळ्यास सर्व शिक्षकवृंदांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments