Header Ads Widget

national taekwondo : गौरी विलणकरच्या कामगिरीकडे लक्ष


national taekwondo :  गौरी विलणकरच्या कामगिरीकडे लक्ष

- संदीप शेमणकर

रत्नागिरी - ७ वी राष्ट्रीय कॅडेट क्युरोगी आणि पूमसे चॅम्पियनशिप स्पर्धा विशाखापटनम आंध्र प्रदेश येथे दिनांक १ ते ४ऑगस्ट रोजी होणारआहे. यासाठी रत्नागिरीतील गणराज तायक्वॉडो क्लबमधील गौरी विलणकर रवाना झाली असून तिच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

या स्पर्धेसाठी गौरी हिने ७ वी राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांडो स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. ही स्पर्धा नुकतीच १९ ते २१ जुलै रोजी भद्रावती चंद्रपूर येथे पार पडली. रत्नागिरीतील गणराज तायक्वॉडो क्लबमधील गौरी विलणकर हिने ५९ वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. 

या कामगिरीबाबत गौरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गौरी हिला प्रशांत मनोज मकवाना, महिला प्रमुख प्रशिक्षक आराध्या मकवाना यांचे मार्गदर्शन लाभत आहे. 

याआधी गौरीने खेलो इंडिया स्पर्धत सुवर्णपदक प्राप्त केले होते. गौरीला तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भाराजगे, सचिव मिलिंद पाठारे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, धुळेछंद मेश्राम खजिनदार व्यंकटेशराव करा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण करा, कोषाध्यक्ष शशांक घडशी,  तायक्वांडो प्रशिक्षक शाहरुख शेख, मिलिंद भागवत रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सर्व पदाधिकारी, पालकवर्ग, गणराज क्लबचे पदाधिकारी नूतन कीर, साक्षी मयेकर, कनिष्का शेरे, भगवान गुरव, रंजना मोडूळा, यशंवत शेलार, पूजा कवितके यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


जाहिरात  - अभिज्ञान अकादमी


Post a Comment

0 Comments