kasheli : कशेळीत वाचनालयाचे उद्घाटन
नाटे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस अधिकारी केदारी यांच्या हस्ते उद्घाटन
शिवसंस्कार मंडळाचा पुढाकार
- संदीप शेमणकर
कशेळी - कशेळी गावात शिवसंस्कार मंडळ कशेळी यांच्या पुढाकाराने आणि सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस अधिकारी केदारी यांच्या हस्ते वाचनालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सोमवारी दिनांक 29 जुलै 2024 रोजी उद्घाटन सोहळा पार पडला.
कशेळीतील शिवसंस्कार मंडळ हे सामाजिक कार्यासोबत शैक्षणिक कार्यातदेखील गावासाठी महत्त्वाची कामगिरी आणि जबाबदारी पार पाडत असते. या मंडळातर्फे गरीब मुलांना दत्तक घेऊन मंडळाच्या वतीनेच त्यांचा खर्च उचलला जातो. त्याचप्रमाणे गावातील शाळांना शिष्यवृत्ती परीक्षांसारख्या स्पर्धा परीक्षा घेण्यात मंडळाचा मोठा सहभाग असतो. या वर्षी झालेल्या शिवजयंती उत्सव वेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वाचनालय सुरू करण्याची संकल्पना बोलून दाखवली होती. त्यावेळी उपस्थित असलेले नाटे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस अधिकारी केदारी यांनी वाचनालय सुरू करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याचसोबत गावातील काही दानशूर समाजसेवक यांच्या सहकार्याने वाचनालयाचा उद्धाटन सोहळा पार पडला.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस अधिकारी केदारी तसेच गावच्या सरपंच हळदणकर आणि ग्रामपंचायत सदस्य, शिवसंस्कार मंडळाचे अध्यक्ष संदेश शिवगण, उपाध्यक्ष सुशांत राडये, आदित्य राडये आणि सभासद तसेच सुयोग विकास विद्यामंदिर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिकेत यादव त्याचप्रमाणे सर्व पालकवर्ग उपस्थिती होते.
सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका दाते, केंद्रप्रमुख जायंदे आणि सर्व शिक्षकवर्ग त्याचप्रमाणे शिवसंस्कार मंडळाच्या सर्व सभासद यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. कशेळी गावातील ग्रामस्थ, पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या वाचनालयाचा फायदा कशेळी आणि आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना यांना होणार आहे. सर्व स्तरातून शिवसंस्कार मंडळाच्या या कार्याबाबत पाठीवर कौतुकाची थाप मिळत आहे.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
0 Comments