शक्ती - तुरा सामना जंगी, गरीब मुलांच्या उन्नतीसाठी
विरार - कुणबी समाजोन्नती संघाच्या शाखा विरारने समाजातील गोरगरीब मुलांच्या उन्नतीसाठी अभिनव उपक्रम आखला आहे. गोरगरीब मुलांच्या मदतीसाठी कुणबी युवा विरार,महिला मंडळ संकल्पित कोकणातील प्रसिद्ध लोककला म्हणजेच जाखडी अर्थातच शक्ती - तुरा सामना आयोजित करण्यात आला आहे. शक्ती - तुऱ्याचा हा जंगी सामना रविवारी २८ जुलै रोजी विरार येथील सुखबाई हॉल, मनवेल पाडा. विरार येथे आयोजित करण्यात आला आहे.
कोकणातील सुप्रसिद्ध युवा शाहीर यांच्यात हा शक्ती - तुरा सामना रंगणार आहे. कोकण माझं जगात भारी या गाण्याचे गायक झी टीव्ही कलर मराठी सन्मानित शक्तिवाले शाहीर विनेश वाजे आणि सुमधुर आवाजाचे युवा फेम विरार नालासोपारामध्ये प्रसिद्ध असलेले युवा शाहीर तुरेवाले नितीन आंब्रे यांचा हा शक्ती - तुरा सामना होणार आहे.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या तिकिटाचे पैसे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तिकिटासाठी संपर्क
एकनाथ डिंगणकर - 8369927960
शैलेश बामणे : 8097312406
अविनाश पाचकले :9594991198
विलास सुवरे :9920197006
शैलेश दळवी :8850855117
सुनील रेवाळे :8767431173
अरुण ठोंबरे :9324614391
0 Comments