school damage : शाळेवर पडलं झाड, नेत्यांनी दिला मदतीचा हात
उदय सामंत, किरण सामंत, दीपक नागलेंचा पुढाकार
राजापूर - कोकणात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून झाडे पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राजापुरातील शिवणे बुद्रुक येथील प्राथमिक शाळेवर झाड पडल्याने दोन वर्गखोल्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
या घटनेची माहिती मिळताच सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरेंच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक नागले यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह शाळेला भेट दिली. त्यानंतर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना याची माहिती दिली. उदय सामंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच जिल्हा प्रशासनास नवीन दोन वर्गखोल्यांसाठी निधीला मंजुरी देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले.
चिमुकल्यांचा जीव वाचला
शिवणे बुद्रुक येथील शाळेवर झाड पडल्याने दोन वर्गखोल्यांचे नुकसान तर झाले, मात्र ही घटना घडली तेव्हा विद्यार्थी वर्गात होते अशी चर्चा आहे. शाळेचे नुकसान झाले असले तरी चिमुकल्यांचे जीव वाचल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
0 Comments