मोगरे, भराडे शाळांना संगणक भेट; कृष्णा बावकरांचा पुढाकार
आमदार राजन साळवी यांची प्रमुख उपस्थिती
- संदीप शेमणकर
राजापूर - आडिवरे परिसरातील मौजे मोगरे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मोगरे तसेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा भराडे या दोन शाळांना संगणक भेट देण्यात आली. यासाठी कृष्णा बावकर यांनी पुढाकार घेतला. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राजन साळवी उपस्थित होते.
मोगरे- राजवाडी पंचक्रोशीतील कांगापूर गावातील ग्रामस्थ दानशूर व्यक्तिमत्व आणि कट्टर शिवसैनिक उपशाखाप्रमुख कृष्णा शिवराम बावकर यांनी अमी पार्क शाखा नालासोपारा (पश्चिम) यांच्या सौजन्याने आणि सहकार्याने आमदार राजन साळवी यांच्या हस्ते संगणक मोगरे आणि भराडे शाळांना भेट देण्यात आले. यावेळी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी, सभापती प्रकाश गुरव, मोगरेशाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा कुंभार, हेमंत पाटील गुरुजी, नांदगावकर गुरुजी, कटेरे गुरुजी, बालवाडी शिक्षिका प्रियंका बाणे, मदतनीस, भराडे शाळा मुख्याध्यापक घुमे गुरुजी, वारीक गुरुजी, उपशाखाप्रमुख अमी पार्क नालासोपाराचे कृष्णा बावकर, उपशाखाप्रमुख पांचाळ नगर नालासोपाराचे सुनील शिवगण, गाव संघटक मोगरे प्रकाश चव्हाण, विलास साखरकर, पत्रकार संदीप शेमणकर, मोगरे विकास मंडळ सचिव चंद्रकांत साखरकर, विभागप्रमुख सुभाष पावणाक, युवासेना उमेश शेंडेकर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र थारळी, गणेश थारळी, शाखाप्रमुख सत्यवान नार्वेकर, गणपत आयरे, महिला उपविभाग संघटक साक्षी कुवेसकर, रवी जोशी, राजेंद्र सातोपे, बाळकृष्ण शेमणकर आणि समस्त मोगरे, भराडेवासीय उपस्थित होते. यावेळी आमदार राजन साळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
हेमंत पाटील गुरुजी, घुमे गुरुजी यांनी सूत्रसंचालन करून सभागृहातील उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले. सर्व प्रमुख मान्यवर, मोगरे - भराडे शाळांतील शिक्षकवृंद, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
0 Comments