Header Ads Widget

dhaulvalli : शैक्षणिक साहित्यवाटप; उत्कर्ष मंडळाचा पुढाकार


dhaulvalli : शैक्षणिक साहित्यवाटप; उत्कर्ष मंडळाचा पुढाकार

- संदीप शेमणकर

राजापूर -  जिल्हा परिषद शाळा धाऊलवल्ली नं.१ तालुका राजापूर येथे लांजा, राजापूर, संगमेश्वर, तालुका उत्कर्ष मंडळातर्फे शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाला. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुचिता आपटे यांची कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली. 

ग्रामपंचायत धाऊलवल्लीच्या सरपंच रश्मी बाणे आणि नायब तहसीलदार पंडित यांनी कार्यक्रमाला उपस्थितीती लावली होती. कार्यक्रमासाठी  उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सायली गोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रास्ताविकात मंडळाने शाळेला आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. त्यानंतर लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळाचे चिटणीस प्रशांत साळुंखे यांनी मंडळाच्या ३४ वर्षांच्या वाटचालीबाबत आढावा घेतला. विद्यार्थ्यांचे भावी जीवन समृद्ध होण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपस्थित पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांना नायब तहसीलदार पंडित यांनी वाचनाची आवड गोडी कशी निर्माण होते. तसेच पालकांची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

जाहिरात - अभिज्ञान अकादमी

तसेच कु. प्रिया प्रसाद काळे हिचा राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षेत सोळावा क्रमांक आल्याबद्दल मंडळाच्या सदस्यांनी बक्षीस देऊन गौरव केला. कार्यक्रमाला बहुतांश पालकवर्ग, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रांजली बाणे, मंडळाचे सरचिटणीस मधुकर पवार, चव्हाण, उपाध्यक्ष राजाराम मिरगुले, शंकर सुर्वे, तुकाराम साळुंखे, भुर्के, संजय गोरे उपस्थित होते. शाळेच्या उपशिक्षिका मुल्ला यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा  समारोप केला.

Post a Comment

0 Comments