Header Ads Widget

भुकेने घेतला बिबट्याचा जीव?


भुकेने घेतला बिबट्याचा जीव?

- संदीप शेमणकर

राजापूर - तालुक्यातील सोलगाव, देवीची गुरववाडी येथील वसंत नारायण गुरव यांच्या घराच्या परिसरात बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे. सदर बिबट्याचा भुकेने मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाकडून वर्तविण्यात आला आहे.    

याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोलगाव देवीची गुरववाडी येथील वसंत गुरव हे मुंबईला वास्तव्यास असून त्यांचे घर बंद असते. बुधवारी दुपारी गुरव यांच्या घराशेजारी  बिबट्या असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.  त्यांनी तात्काळ याबाबत वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र घराबाहेर असलेला बिबट्या मृत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.  

त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्पत बिबट्याची तपासणी करण्यात आली. सदर मृत बिबट्या मादी असून 5 ते 6 महिने वयाची असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. तसेच भुकेने बिबट्या मृत झाल्याचा अंदाजही वनविभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यावेळी रत्नागिरी परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार, राजापूर वनपाल जयराम बावदाणे, रत्नागिरी लेखापाल तानाजी पाटील, राजापूर वनरक्षक विक्रम कुंभार यांच्यासह अनिकेत मोरे, नितेश गुरव आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments